Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अबोटी [व्युढ married, व्युढता marriedness. अव्यूढता unmarriedness = अबोटी] unmarried state, Bachellorship.
जाततेन प्रसंगें । स्त्रीदेह सिवणें आंगें ।
तेथौनि देह आवघें । अबोटी कीजे ॥ ज्ञा. १७-२१०
अंबोली [अंबुपल्ली = अंबोली ]
अब्द [ आ + पद्]
अब्दणें [पद् ४ गतौ. आपद् पासून मराठी क्रियापद अब्दणें ] अब्दणें म्हणजे आपद्, संकट, कष्ट सोसणें. ( धा. सा. श. )
अब्दा [आपद्, आपदा ] (आबद पहा)
अंब्या [ अंबिआ पहा]
अभंग - अभंग म्हणजे पर्यायोक्ति, व्यंजना लक्षणा वगैरेंच्या द्वारा बोलण्याचा प्रकार. अभंग म्हणजे खडे बोल, वाच्यार्थानें स्पष्ट बोलण्याचा प्रकार. त्यांत पर्यायानें आढेवेढे घेऊन बोलणें नसतें. जें काय सांगावयाचें तें उघड उत्तान अर्थानें व शब्दांनीं सांगावयाचें. (भा. इ. १८३३)
अभ्रा [ अंबरकः = अंब्रा = अभ्रा, आभ्रा] अंगरख्याच्या आंत लावलेलें जोड कापड.
अंमळ [ अम्नर् ( अल्पार्थे निपातः ) = अम्मल = अंमळ] (भा. इ. १८३४)
अमुक [ अमुष्य = अमुक ] This one. अमुष्य हें नाम आहे. ष्य हा षष्ठीचा प्रत्यय सर्वनाम आहे.
अमूप [ अनुपम = अनुप अँ = अमूप, मूप, मोप, म्होप] - (भा. इ. १८३२)
अरबट [ अपभ्रष्ट = अरबट्ट = अरबट ]
अरर ! अररे ! (अव्यय, घाई दाखविणारें ) [ अररे = अररे, अरर ] (भा. इ. १८३६)
अरेहल्या [ आर्यहलं ( बलात्कारे निपातः) = अरेहल्या ] पाणिनीच्या वेळेपासून हा निपात बैलांना हाकतांना करीत आले आहेत. (भा. इ. १८३४)
अर्ज [ अर्जी पहा]
अर्जी [ अर्द् १ याचने, अर्दितं (याचितं) = अर्जी, अर्ज ] अर्जी, अर्ज म्ह. याचना.
अर्जीदन् या फारसी क्रियापदापासून हि अर्जी शब्द निघतो. परंतु फारसी अर्जीदन् च स्वतः संस्कृत अर्द धातूपासून निघालेलें आहे. ( धा. सा. शब्द)