जयवन्त - द्रोणपर्वतजीवन्तादन्यतरस्यान् (४-१-१०३ )
एभ्यो गोत्रे फग् वा । जैवंतायनः जैवन्तिः वा ।
जीवन्त नामक मूळ गोत्रोत्पादक पुरुषापासून जे उत्पन्न झाले ते जैवन्तायन किंवा जैवन्ति. जैवन्ति शब्दाचा मराठी अपभ्रंश जैवन्त किंवा जयवंत. जय (जिंकणें) या शब्दाशीं जयवंत, जैवंत या प्रभु आडनांवाचा कांहीं एक संबंध नाहीं. ( प्र. सं. वृत्त )
जरकारे - जारत्काराः (स)
जाइल - जायनिः ( कों )
जामडे - जामदग्नाः (स)
जालंधर - जानंधरिः (स)
जेधे - यौधेयः = जउधेआ = जइधा = जेधा. the जेधाs are योधेयs from यौधेयपुर = जोधपुर.
जोग - ( प्राचीन ) योगा: ( कों )
जोगदेव - सिंघण यादवाच्या इ. स. १२२२ तल्या एका शिलालेखांत जोगदेव हा दंडनायक होता असें म्हटलें आहे. (भा. इ. १८३२)
जोगधर - युगंधराः = (कों ) (स)
जोगळेकर - १ यौगोलिः= जोगळेकर (केर प्रत्यय) (कों)
- २ यौगोलिः = जोगोळि (कर) = जोगळेकर (स)
जोशी - १ धंद्यावरून (कों ) ( क )
-२ मूळ संस्कृत ज्योतिषी; त्याचें प्राकृत जोइसी; त्याचें वर्तमान मराठी जोशी. जोइसी, जोइशी हें रूप १७ व्या व १६ व्या शतकांतील कित्येक मराठी वांटपपत्रांत येतें.
( सरस्वतीमंदिर शके १८२३ )
झ
झा [ उपाध्याय ] ( पाध्ये पहा )
ट
टट्टू - त्वष्टऋ ( तट्टू पहा)
टाकरे - तत्करः ( master's obedient servant doing that, servant तस्य करोति = तत्करः ) =
टाकरे = ठाकरे ( परभू अडनांव ) (पाणिनि ३-२-२१ )
टिके - तैकायनिः ( स)
टिकेकर - तैकायनिः (स)
टेणे - ष्टैकायणाः (कों)
टोळे - स्थौलेयाः (कों)