Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

कुरडणें [ क्रुथनं ] (भा. इ. १८३४)

कुरंडी [ कुरंटिका = कुरंडी ] (भा. इ. १८३४)

कुरडू [ कुरंटी = कुरडी, कुरडू]

कुरळ [ कुरल किंवा कुरुल (curly hair) = कुरळ (केस) (ळा, ळी, ळें) किंवा कुरुळ (ळा, ळी, ळें ) ] (भा. इ. १८३५)

कुरुठा [ कुरोधस्] रोधस् म्हणजे बांध embankment किंवा कुरोधः रोधः म्हणजे बांध, वेढा, अडचण. (ज्ञा. अ. ९ पृ. १५२)

कुरुंद १ [कुरुविंद = कुरुंद ] शिलाविशेष. कुरुविंदास्तु कुल्माषाः (वैजयंती, पृ. ४४)

-२ [ कुरुंब (सिंदुवारपुष्पवर्णदृषद्) = कुरुंद ] कुरुंदाचा दगड प्रसिद्ध आहे. जातीं करतात. हा शब्द कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या Book २ chap. १२ मध्यें आला आहे.

कुर् झ्या [ कुर्+ झ्यु गतौ = कुर् झ्या ( get on ) ]
कुर् sound of friendship.

कुर्‍हाडफोडी [ परशुस्फोटितानि दारूणि = फरसफोडा कुठारस्फोटितानि = कुर्‍हाडफोडी (पाणिनि २-१-३२)]

कुलुंगा (कुत्रा) [ कुलुंग (एक प्रकारचा हरीण) = कुलुंग ( गा-गी-गें ) ] कुलुंग हरणासारखें बारीक आकाराचें कुत्रें. (भा. इ. १८३५)

कुलुली [( नपुं. ) कुरीरं ( स्त्रीभोग ) = कुलील = कुलुली ( स्त्री. ) ] कुलुली म्ह० स्त्रीभोगेच्छा. संस्कृतांत कुरीरी किंवा कुरुरी असा शब्द असावा. ( भा. इ. १८३५ )

कुल्ला [ कोल = कोला = कुल्ला ] अवयवविशेष. (भा. इ. १८३५)

कुल्हार [कुलागार family-house = कुल्हार ]
जें भूलिचें कुल्हार । वायुत्त्वाचें अंतर । बुद्धिचें द्वार । झांकललें जेणें ॥ ज्ञा. १३-११५

कुंवार, कुंवारी [ कुमारी = कुंवारी, कुंवार, कोंवार ] (स. मंदिर)

कुशळ [कुशल = कुशळ. ल = ळ. ल्य = ल]

कुशी [ कुशी ] (कुसा पहा)

कुसरूड [ कोशकारकीट: = कोसरूड = कुसरूड] सुरवंट.

कुसळ [ कुशल्य = कुसळ. शल् १ गतौ ] तो काय माझें कुसळ उपटतो आहे? येथें कुसळ म्ह० वाईट शल्य.