Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
मरमारु [ मर्मारुक ] ( धातुकोश-मरमर पहा )
मरी [ मृति स्ते भूयात् = मरीं तुझी होवो. मृती = मरी ]
मरुळी [ मरुपल्ली = मरुळी ] (भा. इ. १८३६)
मर्तिक [ मार्तक्यं ( मृतक म्हणजे प्रेत, त्यासंबंधी क्रिया) = मर्तिक ]
मर्या [ मर्यक a little man = मर्या ] मर्या ! कोठें जळला होतास ?
मर्वा [ मरुबक = मरुअअ = मर्वा ] (भा. इ. १८३४)
मलई [ मृज्या washings, purifications = मलई, मळई, मळी ] मलई म्हणजे दुधावरची साय. मळई म्हणजे लोणी, साखर, उसाचा रस अति तापवला असतां वर साचतें दाट धुवण तें. मळईचा च अपभ्रंश मळी.
मलखांब [मल्स्तंभ = मलखांब ] (भा. इ. १८३२)
मलमल [ मलमल्लकं (आच्छादनं) = मलमल (वस्त्रविशेष)]
मवागी [ मृद्वगता = मवागी ]
मवाळ [ मृदुल = मउल=मवळ = मवाळ ] (ग्रंथमाला)
मवाळी [ मृदुलता = मवाळी ]
मस [ ( पु. ) मसिः = मस (पु.) ] मस म्हणजे अंगावरील काळा डाग.
मसण [ मृषाज्ञान ignorance, false knowledge = मसाण = मसण ] मसण तुझें your ignorance असा प्रयोग वडीलधार्या स्त्रिया मुलामुलीसंबंधानें करतात.
मसणा, मसण्या [ अमुष्यायण: (अमक्याचा पुत्र) = (अलोप) मसणा, मसण्या ] मसण्यानें अमुक केलें न तमुक केलें.
मस्करी [ मस्करिन् ( यति) = सन्यासी ] मस्करी करणें म्हणजे असंन्यस्त माणसाला सन्याशासारखें समजणें, करणें. (ग्रंथमाला)
मस्त [ समस्त ] सर्व, पुष्कळ. ( समदें पहा )
महागणें [ मधि कैतवे. मंघनं = महगणें = महागणें ] तो आतांशीं महागला आहे म्ह० लुच्चेगिरीनें दिसत नाहींसा झाला आहे. ( धा. सा. श. )
महांगिरी [ मंगिनी ( तारू) = महांगिनी = महांगिरी ] एका प्रकारच्या तारवांना महांगिर्या म्हणतात.
महात [ महामात्य: = माहात, महात, माहूत ] हा शब्द पंचतंत्र प्रथमतंत्र यांत आला आहे.
महामूर [ महामूल्य = महामूर = म्हामूर ] पुष्कळः किंमतीचें, पुष्कळ.