Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

इंद्रावण [ इंद्रवारुणी = इंद्रावण ( वनस्पति ) ] (भा. इ. १८३७)

इन् मिन् तिन् [ इँ, मीँ, तीँ = हीं, मीं आणि तीं ]
अनुनासिकाचा अनुस्वार उच्चारिला. तीन ह्या संख्यावाचक शब्दाशीं तीँ या सानुनासिक शब्दाचा घोंटाळा करून अर्थनिष्पति केली आहे. (भा. इ. १८३२ )

इरीरी [ ईर् गतौ कंपने. ईरईर ( आज्ञार्थ द्वितीय पुरुष अनेकवचन ) = इरीरी ] इरीरी म्ह० चल चल, चलाव चलाव. ( धा. सा. श. )

इवलेंसे [ एतादृश = एआलिस = इवलेंसें ]

इशी, इश्श् - लहान मूल शौच्याला जावयाचें असल्यास त्याला इशीला जावयाचें का, म्हणून विचारतात. विशि विष्टायां ना. को. ३
(माध्यंदिनीय वाजसनेय संहिता-महीधरकृत वेददीप २५-७). विश् म्हणजे विष्टा. विश्= इश् (स्त्री) = इश. बायका घाणेरडा पदार्थ पाहिला असतां इश्श् मेलं असे शब्द उच्चारितात. त्यांतील इश्श् ह्या शब्दाचा अर्थ विष्टा असा आहे. (भा. इ. १८३३)

इशश् [ ह्रीच्छ् लज्जायां. ह्रीच्छ् = ईच्छ् = इशश् ] (ग्रंथमाला)

इश्शरें - [ विस्त्रं = इश्शरँ = इश्शरें ] विस्रं आमगंधि: ( अमर ) = दुर्गंध, वाईट, मलिन, दुष्ट. इश्शरें भांडें म्ह० मलिन भांडें. इश्शरे माणूस म्ह० मलिन माणूस. इश्शरे बायको म्ह० मलिन बायको. तात्पर्य, इश्शरें हा शब्द मराठींत एकारान्त आहे. (भा. इ. १८३४)

इप् ! [ इस् ! = इष् ! ] इस् हा रागाचा, दुःखाचा उद्गार आहे.

इप्प् [ इस् ! (क्रोध, दुःख, इत्यादि दर्शक अव्यय ) = इष्ष् !, इश्श् ! ]

इसव [ विसर्प = इसब (गर्दे-वाग्भट ) = विसाप ] (भा. इ. १८३४)

इसाड [ ईशा (नांगराचा दांडा = इसा + आड=इसाड ] ( भा. इ. १८३४)

इसोण [ ईषदुष्णं = इसोण, विसोण = विसावण ] थोडेसें विसावण घाल म्ह० ईषदुष्ण पाणी घाल.

इळा, इळी [ इली ] (विळा ३ पहा)

इळेपिळे [ इल् ६ स्वप्ने, क्षेपणे, इल् गतौ निद्रायाम्. इल् + प्रेल् = इळेपिळे ] इळेपिळे देणें म्ह० झोपेंतून उठतांना अंगाला वांकडीतिकडी गति देणें. (धा. सा. श.)