Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

बटाट्या [ अवटीटः flatnose person = बटाट्या चपट्या नकाचा.

बट्टी १ [ मृष्टिः = बट्टी ] Fried wheaten round food.

-२ [ भ्रस्ज ]

बट्टू [अवटुः (मानेवरचा उंच भाग) = बटु ( अलोप ) = वट्टू ] मानेची घाटी. ( भा. इ. १८३६)

बट्टयाबोळ [ वस्तिकापूल: = बट्टिआबोळ = बट्ट्याबोळ ] वस्तिका म्हणजे वस्त्राच्या दशा व पूल म्हणजे ढीग. बट्ट्याबोळ म्हणजे दशांच्या दोरांची गुंतागुंत, गोंधळ, गुतागुंत.

बठ्ठा १ [ अवस्थः (शिस्न) = बठ्ठा ] शिस्न. घ्या माझा बठ्ठा.

-२ [ अवहस्त: ( हाताचा मागला भाग) = बठ्ठा ] हाताचा बठ्ठा.

-३ [ अवष्टंभः = बट्टंहा = बठ्ठा ] त्यानें बट्ठा दाखविला म्हणजे अवष्टंभ ऊर्फ दर्प ऊर्फ उरमटपणा दाखविला. (भा. इ. १८३५)

-४ [ वस्तः (बस्तिः ) = बट्टा ] बठ्ठ्यांत म्हणजे वस्तींत. ( भा. इ. १८३४)

बठ्ठू [ अवस्तु unreality, nonentity = बठ्ठू ] nonentity, nothing. अवस्तुता = बठ्ठ्या. घ्या माझा बट्ठू take nothing from me. घ्या माझा बठ्ठ्या

बठ्ठ्या १ [ अवस्तुता ] (बठ्ठू पहा)

-२ [ बस्तिकः = बठ्ठिआ = बठ्ठ्या ] (भा. इ. १८३४)

बड (डा-डी-डें ) १ [ अभ्यधिक = बढिअ (अलोप) = बढा = बडा ]

-२ [ वड्र = बड (डा-डी-डें) ]

-३ [ बाढ = बड ( डा-डी-डें ). वाढमुष्णं । वाग्भट - अष्टांगहृदय-सूत्रस्थान-अध्याय ५ श्लोक २८ ] (भा. इ. १८३४)

बंड १ [ भंड: = बंड ] दांडगा पोरगा.

-२ [ बंड ( उनाड ) = बंड ] उनाड मुलगा.

-३ [ भंड: ( buffoon ) = बंड ] मुलगा फार बंड आहे म्हणजे चावट खोडकर आहे.

-४ [ वंटः unmarried man, truant profligate = बंड ] Boistrous chap, mutinous chap.

-५ [ वंटालिका a kind of battle, rebelion = बंडाळी. वंट revolt = बंड. unorthodox fighting, mutiny ]