Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
धुई १ [ द्रुही (daughter) = धुई ]
-२ [ दूति = दूइ = धुई ] कामकरीण. (भा. इ. १८३४)
-३ [ दुहितृ = धुइऊ = धुई ] मुलगी. (भा. इ. १८३३)
-४ [ दुहितृ = धुई, धृव ] daughter. बोले सुने आणि लागे धुवे.
धुकें १ [ धुको वायु: (उणादि ३३४ ) ] वायूसारखें पातळ अभ्र. (भा. इ. १८३३)
-२ [ धूम + कं ] ( धातुकोश-धुकट पहा)
धुगघुगणें [ धुक्ष् कृछ्रजीवने = धुगधुगणें ] धुगधुगी [ धुक्षिका = धुगी, ( द्विरुक्त ) धुगधुगी. धुक्ष् जीवने ] धुगधुगी म्हणजे क्षीणपणें जीवंत असणें.
धुडुम् [ द्रुम्म् (vedik to go गतौ) = दुडुम्, धुडुम् ] धुडुम् दिशी चालता झाला.
धुणावळ [ धावनमूल्यं = धौणोळ = धुणोळ = धुणावळ ] हा वळ प्रत्यय मूल्य या संस्कृत शब्दापासून निघालेला आहे. आवली-लि या ओळवाचक संस्कृत शब्दापासून हा शब्द व्युत्पादणें अनुचित होय.
जेवणावळ म्हणजे जेवणाचें मूल्य
खाणावळ म्हणजे खाण्याचें मूल्य
लिहिणावळ म्हणजे लिहिण्याचें मूल्य
घडणावळ म्हणजे घडण्याचें मूल्य
खोदणावळ म्हणजे खोदण्याचें मूल्य
जेव्हां जेवणावळ व खाणावळ ह्या शब्दांचा अर्थ जेवण्याच्या व खाण्याच्या पंक्ति असा असतो, तेव्हां आवालि शब्दापासून निघालेला आवळ प्रत्यय आहे असें समजणें रास्त आहे. (भा. इ. १८३५)
धुंद [ धूमगंध = धुंद ] धुंद म्हणजे धुरकट. धुपारा [ धूपराग = धुपारा]
धुमी १ [ धूमिका = धुमी ]
-२ [ धूम्या a dense mass of smoke = धुमी ]
धुरवणी [ धूम्रपानीयं = धुरवणी ]
धुराडें [ धूम्ररंध्र = धुराडें ]
धुराळा [ धूम्रालि: = धुराळा, धुरोळा ]
धुरु [ध्रुवं = धुरु ] ( भा. इ. १८३४)
धुरोळा [ धूम्रालिः ] ( धुराळा पहा)
धुवण [ धूतपानीयं ] ( धूण २ पहा )