Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

झुळझुळ वाहणें [ श्वल् आशुगमने = झुळझुळ ]

झुळुक [ सृक: ] (झुरका ३ पहा)

झूल [ हुल् आच्छादने होलति, जुहुल्= झूल ] coverlet of an ox, horse, elephant.

झेंगट [ संगतम् = झंगट, झेंगट ] (झंगट पहा)

झेट् [ जिहेठ्] ( झट् पहा)

झेंडा [ ध्वजदंड: = झयअंडा = झेंडा ] प्राकृतांत ध्वज चा अपभ्रंश झय होतो.

झोका [ धक्कः; धक्क् नाशने ] (धकाधकी पहा)

झोट १ [ जूट: = झोट ]

-२ [ सुभटः = झोट ]

झोटिंग [ जोटिगस्तु महाव्रतिः (त्रिकांडशेष)] ( ग्रंथमाला)

झोड १ [ संप्रवृत्तिः set about vigorously = झोड ] कामाची झोड उडवून देणें.

-२ [ संप्रवृष्टिः to be continuously raining = झोड ] पावसाची झोड.

-३ [ हुड् to go जुहुड = झोड ] to approach assiduously anything. o वर झोड उडवून देणें, झोडणें.

-४ [समृद्धि = झोड ] plenty. पैश्याची, कामाची झोड उठविली acquired plenty of money.

झोंड १ [ जोहुंडय = झोंड. हुंड् १ संघाते ] झोंड म्ह. गर्दी करणारा. ( धा. सा. श. )

-२ [ यवीयुध् eager to fight, warlike = झोंड ] warlike, eagar to fight.

झोत १ [ स्रोत: ( निम्नगा-रये) = झोत = धोत ]

-२ [ श्रोतस् = सोत्त = झोत, घोत ]

झोपा, झोंपा [ यूपः = जोपा = झोपा, झोंपा ] वईच्या दाराला झोंपा म्हणतात.

झोल [हुल् १ सरणे. जोहुल्य = झोल] ( धा. सा. श.)

झ्या [ झ्यावस्व = झ्या. झ्यु गतौ ] झ्या म्हणजे चल, निघ, चाल.

झ्या ! झ्या ! [ झ्यु to move, to go झ्याव, झ्याव (imp. second, sing. ) = झ्या ! झ्या ! ]

झ्याट् १ [ ( निपात) स्यात् न गमिष्यामि = झ्याट् ! नाहीं जाणार = may be, I wont go ] झ्याट् = काय होऊल तें होवो. झ्याट् हा शब्द शिवी नाहीं. शिवी असती तर लोक सररहा घरांत बायकापोरांदेखत तो उच्चारते ना. ( भा. इ. १८३४)

-२ [ जिहेठ्] ( झट् पहा)

झ्याट् मारी [स्यात् मारी =झ्याट् मारी ] मारी म्हणजे दुर्गादेवी (स्मशानांतील) स्यात् मारी म्हणजे मारी असेना. हे दोन शब्द हि गाळी नाहींत. (भा. इ. १८३४)