Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

गोंगावणें [(पौनःपुन्य) ञोङूयते = गोंगावतो. ङू नादे] दुसरा शब्द-गंगावण. (भा. इ. १८३६)

गोचीड [गोक्ष्वेड = गोचेड = गोचीड ] (भा. इ. १८३४)

गोजर ( रा-री-रें ) [ गोजरः ( old bull ) = गोजर (रा-री-रें) ] गोजरा म्हणजे मृदू, मऊ, गरीब.

गोजरा [गोचरः (frequented by cows) = गोजरा. गोजर: ( old bull ) = गोजरा ] साजरागोजरा हें पर्वत-नांव आहे.

गोजरी [ गोजरः (old bull) = गोजरी F. ] an old cow.

गोजीरवाण ( णा-णी-णें ) [ गोजरवर्ण: = गोजीरवाणा ] of the kind of a soft old bull.

गोट १ [ गोघा = गोढ = गोट ]गोधा म्हणजे मनगटावर बांधण्याचा कातड्याचा पट्टा. हा शब्द हरिवंशांत आला आहे.

-२ [ कोट: = गोट (camp) ]

गोठण [ गोष्टीनं = गोठण ] जुना गोठा. गोठणें हें ग्रामनाम आहे.

गोठणें [ गोष्ट् (संघाते ) = गोठते ] पानीयं गोष्टते = पाणी गोठतें (भा. इ. १८३६)

गोठा - (सं.) गोष्टी म्हणजे शाला, पडवी, गोठा. प्रथम, गाई, बैल वगैरे जनावरें बांधण्याचा विस्तीर्ण सोपा म्हणजे गोष्टी, गोठा. गोष्ठः = गोठा. नंतर, कोणताही सभा वगैरे भरविण्याचा विस्तीर्ण सोपा, दिवाणखाना वगैरे. (भा. इ. १८३३)

गोंड [ गोवंट: = गोंड ] चरावयाला जाण्याकरितां गुरें एके ठिकाणीं जमविण्याची जागा.

गोडंवें-बी [ गवीधुमत्-मती = गोडंबें-बी ]

गोंडा (घेळणें) [गुंडिकः = गुंडिआ = गोंडा ] गुंडिक म्हणजे कणीक, पीठ. कुत्रें गोंडा घोळतें म्हणजे कुत्रें कणीक खाऊन मिटक्या मारतें. (भा. इ. १८३३)

गोडाजी [ गोध्वजिन् ( शिव ) = गोडाजी ] हे कोण गोडाजी आले म्हणजे ( थट्टेनें ) परमेश्वर शिव आले.

गोंडाळ [ गंडोलः ]

गोड्या [गौतम = गेोडअँ = गोड्या = घोड्या] संस्कृत नाटकांत राजा विदूषकाला या नांवानें संबोधतो. खालच्या दर्जाच्या मित्राला हा शब्द लावीत. सध्यां मराठींत उपहास व तिरस्कार या अर्थी गोड्या व घोड्या हीं संबोधनें योजतात.