Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
घोटमुखी - घोटक (घोडा). खा इ
घोटाणें - घोटकवनं. खा इ
घोटी - घोटक (घोडा) - घोटिका. २ खा इ
घोडगांव - घोटकग्रामं. २ खा इ
घोंडगांव - घोंटा. खा व
घोडजामतळें - घोटकजंबुतलं. खा इ
घोडबुवाघाट - (गांवावरून ). खा प
घोडंबें - घोटक (घोडा) - घोटकाभ्रकं. खा इ
घोडवद - घोटक (घोडा) - घोटकावर्त. खा इ
घोडवेल - घोटकवेरं. खा. इ
घोडसगांव - घोटककर्षग्रामं. खा इ
घोडें - घोटक ( घोडा ) घोटकं. खा इ
घोडेगांव - घोटक (घोडा). २ खा इ
घोडेघाट - घोटकघाटः खा प
घोणशेत - घोणक्षेत्रं (घोणा नांवाच्या किड्यापासून). मा
घोसलें - घोष ( गुराखी ) खा म
च
चकठाण - चक्र (प्रांत, ग्रामसमूह) - चक्रस्थानं. ख म
चकलाद - शकुलाद. भडोच. (पा. ना.)
चचरबुघें- चर्चरीक (वनस्पति). खा व
चचराघाट - (गांवावरून). खा प
चंडकापुर - चंडिकापुरं. खा म
चढाव - शर्ध (गणा, जमाव) - शर्धकवहं. खा म
चंदनपुरी - चंदन. खा व
चनमळबारी - छन्नमलय द्वरिका. खा प
चमगांव - चमू ( सैन्य ) - चमूग्रामं. खा म
चर्होली - सं. प्रा. स्थावरपल्लिका. पुणें (शि. ता. )
चवगांव - चव्य (चवक ). खा व
चावंडेश्वर - चामुंडा (देवी ) - चामुंडेश्वर. खा म
चवदाताल कोंकण - शेलारांच्या जुन्या ताम्रपटांत “ कोकण चौदाशे ” या नांवानें उत्तर कोंकणाचा उल्लेख येतो. फलटण चौर्यायशी, चाकण - चौर्यायशी, प्रमाणेंच उत्तर कोंकणाला कोकण चौदाशे म्हणतात. फलटण चौर्यायशी म्हणजे चौर्यायशी गांव असलेला फलटण प्रांत. तसेंच चौदाशें गांव `ज्यांत आहेत तो उत्तर कोकण प्रांत. यावरून असें दिसतें कीं, ताल हा शब्द शंभरांचा वाचक असावा. " चवदा अथवा चौदा ताल कोकण ” हे शब्द शिवाजीच्या पोवाड्यांत येतात.
(ग्रंथमाला)