Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
निच्छिबींवरून लिछिविदेश ऊर्फ नेपाल. खसांवरून खाशिया. द्रविडांवरून द्रविडदेश. त्याचप्रमाणें करणांवरुन व नटांवरुन करणनटदश हैं देशवाचक नांव निघालेलें दिसतें. न चा ण होऊन - करणनट = करणणट असें रूप झालें. आणि स्वाथें क प्रत्यय लागून, करणाटक असें रूप बनलें. करणाटक म्हणजे करण व नट ह्या व्रात्य क्षत्रियांचा देश. करणाटक ह्या शब्दाचें कन्नड असें कानडी रूप आहे. तें तर
१ करणनट =
२ करण्णट =
३. कण्णड =
४ कन्नड
अशा परंपरेनें बनलेलें दिसतें. कन्नड हा शब्द मूळचा अव्युत्पाद्य शब्द नाही; उघड उघड साधित शब्द आहे. करण व नट लोक ह्या प्रांतांत वसाहत व राज्यें करावयास आल्यापासून कर्णाटक, कन्नड हें नांव ह्या प्रांताला मिळालेलें दिसतें. रामायणांत व महाभारतांत तुंगभद्रेच्या भोंवतालील प्रदेशास करणाटक, कन्नड हें नांव नाही; निराळेच नांव आहे.
करण शब्दावरून करणगांव, कर्णोलि, करणूल (र) व नट शब्दावरून नडिया, नाडियाद, नाटोर हीं देशनामें, पुरनामें, पल्लीनामें व ग्रामनामें झालेलीं आहेत. (भा. इ. १८३२)
कर्णोली - करण. (कर्णाटक पहा)
कर्हाड = कहरट्ट. (वर्हाड पहा)
कर्हाडें - सं. प्रा. करहाटक ( करभवाटकं ). कुलाबा. (शि. ता.)
कर्हें - करभ ( उंट) - करभकं. खा इ
कलापुर - करकपुरं. खा व
कलाली - कोल (लोकनाम ) - कोलपल्ली. खा म
कल्याण - सं. प्रा. कल्याणी. धारवाड, पुणें, ठाणें. (शि. ता.)
कल्याण - कोल (लोकनाम ) - कोलवनं. खा म
कल्याणपुर - सं. प्रा. कल्याणी. बडोदें, कच्छ, काठेवाड. ( शि. ता.)
कल्याणें - कोल ( लोक नाम ) - कोलवनकं. २ खा म
कल्याणें - सं. प्रा. कल्याणी. खा (शि. ता.)
कल्हाट - कल्यवाटं (चांगली वाडी). मा
कवटळ - कपित्थपल्लं. ४ खा व
कवराळ - कवरी (तिळवण) - कवर. खा व
कवलाणें - कमलवनं. २ खा व
कवळीथ - कवरी (तिळवण)-कवर-कवरीप्रस्थं. खा व
कशाळ - कशेरु (ग्रामं. कशेरु = नागरमोथा. तो जेथें फार पिके तें गांव). मा