Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

वीरडी - व्रीहिमती. (पा. ना.)

वीरण - वीरणकं. मालवण. ,,

वीरणकोप - वीरणकं. बेळगांव. ,,

वीरणजें - ,, कारवार.

वीरदेल - वीरुधवेरं. खा व

वीरपुर - वीर, वीरा ( अनेक वनस्पति ). खा व

वीरवाडी - व्रीहिमती. ( पा. ना.)

वीरवाडें - वीर, वीरा (अनेक वनस्पति ). खा व

वीरसत - वीरछद. ,,

वीराई - व्रीहिमती. (पा. ना.)

वीरें - वीरेयं. ठाणें. (पा. ना.)

वुपकरी - यूपकागरिका. खा म

वेंकटापूर - विकंकटकं. वेंकट हा शब्द विकंटक या शब्दापासून निघालेला आहे. कोल्हापूर, धारवाड. (पा. ना.)

वेकरवाडी - वैकर्यं. नगर.  ,,

वेग्रें - वैग्रहिः भोर.  ,,

वेटवडें - वेटमत्. कोल्हापूर. ,,

वेटोशी - वेतसकीयं. रत्नागिरी.   ,,   

वेणगांव - वैणुकीयग्रामं. वेणु ज्यांत पुष्कळ आहेत तें. वैणुकीयं.

वेणुपुरी - वेणुकं. भोर. (पा. ना. )

वेदाणें - वैद्यनाथवनं, एकशेष. खा म

वेदं - वेदि. भोर. (पा. ना. )

वेरटिऊ - वैरत्यं. काठेवाड. ,,

वेरुळी - वेल (बाग, कुंज) - वेलपल्ली. २ खा व

वेरुळी - विहारालय. (वेरूळ पहा)

वेरुळी - वैदूर्यिका. (वेरूळ पहा)

वेरुळी - सं. प्रा. वेलापूर. (शि. ता. )

वेरुळें -           ,,             ,,

वेरूळ -         ,,            ,,

वेरूळ - वेल (बाग, कुंज) - वेलापल्लं. खा व

वेरूळ - दौलताबादेजवळ वेरूळचीं लेणीं प्रसिद्ध आहेत. वेरूळ शब्द विहारालय शब्दाचा प्राकृत अपभ्रंश आहे. लहान विहारालय म्हणजे वेरुळी. वांईच्या उत्तरेस अंबाड खिंडीजवळ डोंगरावर वेरुळी म्हणून गांव आहे. वेरुळीचा येरुळी हा अपभ्रंश आहे.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)

वेरूळ - वैदूर्यकं, वैदूर्यिका = वेरुळ, वेरुळी. place name.