Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

राजवड - राजन् - राजवाटं. खा म

राजाणगांव - } राजायनक. ( पा. ना. )
राजाणी - }
राजीवडी - } राजीविन्.
राजीवली - }

राजुरी - राजन् - राजपुरी. २ खा म

राजुरी - राजपुरी हा मूळ संस्कृत शब्द. त्याचें प्राकृत राअउरीशउरी राहुरी; राजा शब्दाचें जुने मराठी राञ, राय. त्यापासून रायपुरी, रायरी, रायरेश्वर. राजपुरी हें गांव वाईच्या दक्षिणस तीन कोसांवर व रायरेश्वराचा डोंगर वाईच्या पश्चिमेस चार कोसांवर आहे. राजपुरी, वेरुळी, रायरेश्वर वगैरे ठिकाणीं जुन्या सिद्ध पुरुषांचीं व राजपुरुषांची एकेका प्रचंड दगडाची थडगीं आहेत. तीं थडगी आपल्या पूर्वजांचीं आहेत, असें तेथील गांवढे सांगतात.
( महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)

राजूर - राजन्. खा म

राजेवाडी - राजवट = राजवाड = राजेवाडी. (उपनामव्युत्पत्तिकोश - राजवाडे शब्द पहा)

राजोरें - राजन् - राजपुरं. २ खा म

राझाणें - रंजक (रक्तचंदन ) - रंजकवनं. खा व

राटवद - रट्ट (लोकनाम राष्ट्रिक) - रट्टावर्त. २ खा म

राडीकळंब - रट्ट (लोकनाम राष्ट्रिक) - रट्टिकाकदंबिक खा म

राणदेवी - राज्ञीदेवी. खा म

राणापूर - राजन्यकपुरं. २ खा म

राणीखडकलें - राज्ञीकटकपल्लं. ,,

राणीपुर - राजीपुरं २ ,,

रातंजन - सं. प्रा. रत्तज्जुन (रक्तार्जुनं ) - बाशीं, नगर ( शि. ता.)

रातातरी - रक्ताक्तं (रक्तचंदन) - रक्ताक्तागारिका. खा व

रातील - रक्तिका ( गुंज ) - रक्तिकापल्लं. ,,

रानमळ - अरण्यमलयः, खा नि

रापापुर - लंपाक (लोकनाम ) - लंपाकपुरं = लंपापुर = रंपापुर = रापापुर. २ खा म

रामडोह - रामर्‍हद = रामडोह name of a village.

रामपुरा - रामपुरक: खा म

रामवाडी - आरामवाटिका. (भा. इ. १८३४)

रामसणी - रामशणिका. खा म