Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

मोहोखेडें - मधुखेटं., खा व

मोहोगणा - मधूकांगण. ३ ,,

मोहोगांव - मधुग्रामं. ,,

मोहोडाळें - मधुद्रुपल्लं. ,,

मोहोबारी - मधूकद्वारिका. ,,

मोहोमुख - मधुमुखं. ,,

मोहोरद - मधुरक (मोहा ) - मधुरकपद्रं. ,,

मोहोरावें - मधुरकबहं. ,,

मोहोळाई - मधुद्रुमावती. खा व

मोहोळांगी - मधुद्रुमांगिका. ,,

म्हसदी - महिषपद्री. २ खा इ

म्हसरद - महिषतरपद्रं. ,,

म्हसर्डें - महिषतरवाटं. ,,

म्हसलें - महिंषपल्लं. ,,

म्हसवें - महिषवहं. ,,

म्हसाणें - महिषावहं. ,,

म्हसार्डी - महिशतरवाटिका. ,,

म्हसावद - महिषावर्त. २ ,,

म्हसास - महिषकर्ष. ,,

म्हसाळ - महिषपल्लं. २ ,,

म्हालाणगांव - मालायन (गोत्रनाम) - मालायनग्रामं. खा म

म्हाळपुर - महल्ल (अंतःपुररक्षक) - महल्लकपुरं. खा म

म्हाळोद - महल्ल (अंतःपुररक्षक) - महल्लकपद्रं. खा म

म्हाळवें - महल्ल (अंतःपुररक्षक) - महल्लकवहं ,,

म्हैसघाट - महिषीघाट. खा प

म्हैसवाडी - महिषवाटिका. खा इ

म्हैसूर - महिषपुर = महिसउर = महिसुर = म्हैसूर. भारतांत माहिष्मती नांवाचीं दोन नगरें येतात. एक नेमाडाच्या जवळचें व दुसरें फार दक्षिणेकडलें. त्याची जागा अद्याप निश्चित झालेली नाहीं. कित्येकांचा असा समज आहे कीं, माहिष्मती हें नांव भारतांत चुकीनें दोनदां आलेलें असावें, परंतु तशी गोष्ट नाही. वर्तमान म्हैसूर शहर ज्या स्थलीं सध्यां आहे त्या स्थलीं पुरातनकालीं माहिष्मती ऊर्फ महिषपुर हें नगर होतें. महिष्मती नांवाची दोन नगरें त्या कालीं होती. (भा. इ. १८३३)