सालवड - सालवटा. खा न
सालसिंगी - सालशृगिका. खा व
सांवखेडें - श्याम (तमाल) - श्यामखेटकं. १५ ,,
सावंतखेड़ें - सामंतखेटं. खा म
सांवदें - श्यामपद्रं. ३ खा व
सांवरगांव - शाल्मलि. ,,
सांवरट - श्याल्मलिअट्ट. ,,
सांवरबारी - श्याल्मलीद्वार्. खा प
सावरळें - श्याल्मलि. खा व
सांवरें - श्याम (तमाल). ,,
सावळखेडें - श्याल्मलि. ,,
सांवळदें - श्याल्मलिपद्रं. ४ ,,
सांवळी - श्याम ( तमाल) - श्यामपल्ली. ,,
सांवळें - श्यामपल्लं (रंगावरुन). मा
सांवेर - श्यामाकवेरं. खा व
साहूड - साधुवाटं. खा म
साहुर - साधुपुरं. ,,
साळवन - साळ. खा व
साळवें - सालवहं. ,,
साळुंबरें - सालौदुंबरं (साल व उंबर जेथें फार होत तें ). मा
साळेगांव - सल्लकीग्रामं. खा व
सिकावल - शिखावलं (मोर) - शिखावलं. खा इ
सिंगत - सिंहगर्ता. ,,
सिंगपुर - सिंहपुरं. ,,
सिगमाळ - सिंहमालः ,,
सिंगायत - सिंहायतनं. ,,
सिंगावण - सिंहकवनं. ,,
सिगावें - सिंहवहं. ,,
सिंघवद - सिंहावर्त. ,,
सिंघाडी - सिंहवाटिका. ,,
सितखेड - सिद्धक्षेत्र = सिदखेड्ड = सिदखेड, सितखेड. (भा. इ. १८३४)
सिताण - चित्रक (चित्ता) - चित्रकवनं. खा इ
सिताणें - ,, - ,, ,,
सिताबरडी - नागपुरजवळ ह्या चांगाचे एक स्थळ आहे. त्याचें मूळ नांव चित्ताबरडी. चिताबरडी म्हणजे नागपूरकर भोसल्यांचे शिकारखान्यांतील चित्ते ज्या बरडीवर म्हणजे उंचवठ्यावर ठेवलेले असत तो उंचवटा. चि चा सि होऊन सिताबरडी. (भा. इ. १८३३)