सांगवी - संगमी (वाटिका) (दोन ओढ्यांच्या संगमावर असणारें गांव). मा
सांगावें - संगमं. खा नि
सांगीसें - ( सांगवीसें ) = संगमीशयं ( सांगवी खालील गांव). मा
सांजगांव - सर्जग्रामं. खा व
साजरणें - सर्जारण्यं. खा व
साजरा गोजरा - सह्यगिरि: = सज्जइरि= साजेरी = साजरा.
गुह्यगिरिः = गुज्जइरि = गुजेरी = गोजरा.
साजरागोजरा हें महाराष्ट्रांतील एका किल्ल्याचें नांव आहे.
सांजरी - सर्जपुरी. खा व
साजवाहाळ - सर्जवाहालि. खा व
सांजोरी - सर्जपुरी. ,,
सांजोळें - सर्जपल्लं. ,,
सांडवें - षंड ( वसू ) - षंडवहं. खा इ
सांडस - षंड ( वसू ) - षंडकर्षं. ,,
सांडसी - शंडिक. ठाणें. (पा. ना. )
सांडवें - शंडिक. रत्नागिरी. ,,
सातगांव - सात्वत - सतिअ (लोकनाम) - सात्वतग्रामं. खा म
सातपुडा - सप्तपुटः खा प
सातमहू - सात्वत - सतिअ (लोकनाम) - सात्वतमधूकं. खा म
सातमळा - सात्वत-सतिअ (लोकनाम) - सात्वतमलय: खा म
सातमाणें - सात्वत - सतिअ (लोकनाम). २. खा म
सातमाळ - खा प
सातरी - सप्तार्चिः खा व
सातवें - शक्तिमत्. कोल्हापूर. (पा. ना. )
सातारा - हा शब्द सितारा ह्या फारशी शब्दापासून निघाला असावा असें अनेकांचें म्हणणें आहे. माझ्या मतें हा शब्द शुद्ध मराठी आहे. सध्याच्या सातार्याच्या दक्षिणेस सातें म्हणून एक गांव आहे, त्याच्या जवळचा जो दरा तो सातदरा. हा सातदरा सातारा किल्ल्याच्या दक्षिणेस ऊरमोडीच्या पलीकडे जो डोंगर आहे त्याच्या कुशींत आहे. जुना सातारा म्हणून ज्याला म्हणतात तें गांव व तो दरा येथेंच होतें व आहे. पुढें महादर्याच्या जवळ जुन्या सातार्यांतील लोकांनीं येऊन वस्ती दिली, तेव्हां त्या वस्तीला सातारा हें नांव पडलें. मराठी सातारा व फारशी सितारा हे शब्द एका वेलांटीनेंच तेवढे भिन्न असल्यामुळें व फारशींत सतारा व सितारा हे दोन्ही शब्द एकाच अक्षरांनीं लिहीत असल्यामुळें सातारा हा शब्द सितारा ह्या फारशी शब्दाचा अपभ्रंश असावा, असा तर्क निघाला. परंतु मुसुलमानांचें आगमन महाराष्ट्रांत होण्याच्या पूर्वी सातदरा ऊर्फ सातारा अस्तित्वांत असल्यामुळे, हा तर्क निराधार आहे हें उघड आहे.
( महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६ )