य
यदलपुर - २ खा मु
यावल - यामल (गोत्रनाम) - यामलकं. खा म
येरुळी - विहारालय. (वेरुळ पहा)
येवती - युवती-युवतिका. २ खा म
येसगांव - वैश्यग्रामं. २ खा म
येसर - वैश्यपुरं. ,,
येसरबारी - गांवावरून. खा प
येळसें - वेलाशयं (वेलापुराखालील गांव). मा
र
रक - रक. कोठेवाड. (पा. ना.)
रंकाळे - रंकु.
रंकाळे - कोल्हापुरास एक मोठा तलाव आहे, त्याला रंकाळ्याचा तलाव म्हणतात. त्याचें कारण असें सांगतात कीं, ह्या ठिकाणीं एक अत्यंत दरिद्री माणूस रहात होता. त्यानें कवडी कवडी भिक्षा मागून हें तळे मूळ बांधलें. ह्या आख्यायिकेवर जर फारशी भिस्त ठेविली नाहीं, तर ह्या शब्दाची व्युत्पत्ति निराळया तर्हेनें करतां येण्यासारखी आहे. कोल्हापुरास पुष्कळ तळ्यांना नांवें झाडांवरून पडलीं आहेत. जसें पद्माळें वगैरे. त्याप्रमाणेंच रंकाळे शब्द हा एका जुन्या वनस्पतिवाचक शब्दाचा अपभ्रंश आहे. लंकालय असा शब्द गाथासप्तशतीच्या चवथ्या शतकाच्या ११ व्या श्लोकांत आला आहे. " लंका रक्षःपुरी शाखा शाकिनी कुलटासु च. ” लंका म्हणजे झाडी, कुंज ज्या तळ्याभोंवतीं आहेत तें लंकालय. ह्या लंकालयांत एक जुना संध्यामठ आहे. तो पन्हाळच्या भोजराजाच्या वेळेपासूनचा आहे असें म्हणतात. व त्या मठाच्या रचनेवरून तो त्या वेळचा असावा ह्यांत संशय नाही.
(महाराष्ट्र इतिहास मासिक - श्रावण शक १८२६)
रंगवल्ली - रंगवल्लिका. खा न
रघतविहीर - रक्तविवरिक. खा नि
रंजाणें - रंजक (रक्तचंदन). २ खा वि
रंजाळे - रंजक (रक्तचंदन). ,,
रद्धावण - राधा (आंबळी) - राधवनं. ,,
रणगांव - राज्यन्यग्रामं. २ खा म