कांठेवाड - कंथिकवाट: = कांठिअवाड = कांठेवाड, काठेवाड.
कांडवेल - कांड (तृण). खा व
कांडिवली - सं. प्रा. कंडवल. पनवेल. (शि. ता. )
काणूर - सं. प्रा. कर्ण्णपुर. बेळगांव नगर. (शि. ता.)
काणूर - कर्णपुरं = कण्णउर = कणूर. (कणूर पहा)
कातरवेल - }
कातर - }
कातरी - } कर्त्तरीय (विषारी वनस्पति ). खा व
कातरें - }
कातलगांव- }
कातवी - कृत्तिवहा ( कृत्ति = कातडें ). मा
कांथर्डें - कांतार (अरण्य) - कातांरवाटं. २. खा नि
कान - कृष्ण खा न
कानगांव - कन्हगिरि. (कान्हेरी पहा)
कानडी - सं. प्रा. कण्ण. पुणें, नाशीक, ठाणें. (शि. ता.)
कानडी - कर्णाटी ( वनस्पति ). २ खा व
कानलदी - कृष्णलानदी. खा न
कानसवाडें - कर्णश्रवस् ( ऋषिनाम ) - कर्णश्रवोवाटं. खा म
कानळदें - कंदालु (सुरण) कंदालुपद्रं. २ खा व
कान्हरडें - कृष्णा - कृष्णगिरिवाटं. खा म
कान्हें - कृष्ण (ग्राम ), कर्ण (ग्राम ). मा
कान्हेरी - कन्हगिरी = कान्हेरी. (भा. इ. १८३३)
कान्हेरी - कन्हगिरीचा अपभ्रंश कन्हेरी, कान्हेरी, कण्हेरी. कण्हेरी हें गांव वांईच्या उत्तरेस असणार्या मांढरदेवीच्या डोंगराच्या पूर्वेस दोन कोसांवर व शिरवळाच्या दक्षिणेस दोन कोसांवर आहे. येथें डोंगरांत एक विहार आहे. त्याचें तोंड एका प्रचंड शिलेनें कोंदलें आहे. आंत खोल्या, तळें वगैरे आहेत म्हणून वृद्ध सांगतात. कण्हेरी येथील रामदाशी मठाचे मूळ संस्थापक वासुदेवबोवा-रामदास स्वामींचे शिष्य-ह्या गुहेंत तपश्चर्या करीत असत.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
कान्होबाचा सोंडा - कृष्णपादशुंडा. खा प
कापडणें - कर्पटिन् ( वारकरी भिकारी ) - कर्पटिस्थानं. खा म
कापडवाव - कर्पटिन् (वारकरी भिकारी) - कर्पटिवापी. खा म