मामू १ [ मातृ + मा ( द्वित्त) = मामा = मामू (उकारान्त ) (स. मं. )
-२ [ मयोभूः (मय इति सुखनाम, सुखस्य भावयिता = मामू ] यस्ते स्तनः शशयु र्यो मयोभूः ( अथर्ववेद, सप्तमकांड, अनुवाक १ सूत्र १२) मामू म्हणजे मुलाला सुख देणारा स्तन.
माय [ मातृ ] (माता पहा)
माया [ मात्रा = मायाँ = माया ] कागदाला माया सोडणें.
मारका-की-कें [ मारुकः = मारका ] नास्य आम माहरेयुः अभिमारुका हैष देवः प्रजा भवतीति
(आश्वलायन गृह्यसूत्र ४-९-३२ )
मारक या शब्दाहून हा (मारुकोत्पन्न ) मारका-की-कें शब्द निराळा आहे. तो बैल मारका आहे, ती गाय मारकी आहे, तें वांसरूं मारकें आहे. परंतु तें औषध, तो उपाय, ती सूचना मारक आहे. मूळ संस्कृत प्रत्यय दोन्ही ठिकाणीं निरनिराळे आहेत. (भा. इ. १८३६)
मार बस [ पायावर मार बसणें to receive a bruise on the leg. (वैदिक ) मृ to bruise, crush गुणाति ]
मारि [ मरकी १ पहा ]
मारू [ माङ् ऋधक् = मारू ] ऋधक् सत्ये निपातः मारू म्हणजे खरें तर, उत्तम, बेश. (भा. इ. १८३४)
मारून कुटून [ मृ ९ हिंसायां + कुट्ट छेदने ] ( धातुकोश-मारकुट पहा )
मारून मुटकून [ मुट् ६ मर्दने + अकच् ] (धातुकोश-मुटक १ पहा)
माल [ माड् to measure माडः = माल ] that which is measured. धान्य, कापड वगैरे मोजलेले पदार्थ.
मालक - holder of land.
मालाथिलें [ म्लै - म्लात + ल = मालाथिलें ] faded, निस्तेज झालेलें.
माव १ [मातृ ] ( माता पहा )
-२ [ माया = मावा = माव ]
-३ [ मव् बंधने. माव = बंधन ] (ग्रंथमाला)
मावणें [ मानं ] ( माणें पहा )
मावमिऊं [ मातृमुखिकं = माउमुइअ = माउमिऊं मावमिऊँ (अव्यय) ] मातृमुख म्हणजे मूर्ख. माउनिऊं म्हणजे मूर्खासारखें.
मावलि [मात्रावलि = मावलि, माउली ] (स. मं. )