ऐ
ऐक ! [ अतिगमय् (to patiently let pass, to wait) = अइक अँ = ऐकें = ऐके = ऐक ) wait, bepatient. क्षणभर ऐक म्ह० थांब.
ऐट, ऐटा १ [ अतिष्ठा = अइष्ठा = अइट्टा = ऐट.
ऐटा = सर्वश्रेष्ठपणा ] ( धातुकोश-ऐट १ पहा)
ऐटा २ [ अट्टा ] (धातुकोश-ऐट २ पहा )
-३ [ अट्टा (उद्दाम वर्तन ) = ऐटा ]
-४ [ अट्टा overbearing conduct = एटा ] मोनियर बुइल्यम् अट्टा या शब्दाचा अर्थ overbearing conduct असा प्रश्नचिन्ह करून भीत भीतच देतो. परंतु तसा त्याचा अर्थ आहे हैं मराठी अर्थावरून स्पष्ट आहे. (भा. इ. १८३६)
ऐतोजी [ अतिथि ( ऋषिनाम, क्षत्रियनाम ) = ऐतोजी—वा ]
ऐरणी [ अर्याणी = अयरणी = ऐरणी (पूजन ) = अहिरणी (महीरणी ) किंवा आचार्याणी = आयरणी =ऐरणी ]
मातुलानी = माउलणी = मावळाणी = मावळाण = मावळण
मातुल: = माउळा = मावळा.
मातुली = माउली , मावली, माउली.
शक लोकांत मंद म्हणून एक वर्ण होता. त्या शब्दाचें स्त्रीलिंग मंदानी. mandane हा शब्द ग्रीक इतिहासकार जो Herodotus तो देतो. ही मंद लोकांची राणी, हिनें kyrus ऊर्फ कुरुस, पर्शु लोकांचा राजा, ह्याचा पराभव केला. ह्या पराभवांत कुरुस् वारला.
शेटाणी हा शब्द इंद्राणी शब्दासारखा आहे. इंद्र, इंद्राणी; तसें, शेट, शेटाणी. श्रेष्ठिनचें स्त्रीलिंग श्रेष्ठिनी. त्याचें मराठी (सेट्टिणी ) शेटिणी, शेटीण असें व्हावें व होतें. परंतु शेटाणी हें रूप कांहीं श्रेष्ठिनीपासून निर्वचतां येत नाहीं. हा आनी प्रत्यय संस्कृतांत तरी आला कोटून ! वैदिक भाषेत इंद्राणी शब्द आहे. वैदिक भाषेंत तरी हा प्रत्यय आला कोठून ? हा पूर्ववैदिक स्त्रीलिंगाचा प्रत्यय आहे. महार्याणी = महीरणी. (भा. इ. १८३२)
ऐशी - तो आला म्हणजे त्याची ऐशी पूजा करतों = यदा स आयास्यति तदा तस्य अतिश्वीं पूजां करिष्ये. श्वानं अति अतिश्वी = कुत्र्याहून हि जास्त. ऐशी ह्या शब्दाचा ईदृशी या शब्दाशीं येथें कांहींएक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)
ऐस (सा-सी-सें ) [ अतिशय =ऐस ( सा-सी-सें ) ]
ऐसा वडवला = अतिशयितं वधितः
ऐशी दारू प्यालों = अतिशयितां मदिरां पीतवान्.
ऐस ( सा-सी, शी-सें ) [ अतिशयित greatly excessive = अइस (सा-सी-सें ) ] ऐशी खोड काढली म्ह० अतिशयित खोड काढली. अतिश्वी lower than a dog. ऐशी फजिती contempt lower than that shown to a dog.
ऐसा [ अंजसा ( शीघ्रे ) = अंयसा = ऐंसा ] तो ऐंसा पळाला = सः अंजसा पलायितः (भा.इ.१८३४)
ऐसीं [इदृशानि किंवा एतादृशानि ] (ज्ञा. अ. ९ पृ. ५ )