Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

* ५२ येथपर्यंत सुबंताचे विवंचन केले. येथून पुढे पाणिनी ज्याला तिङन्त म्हणतो त्याचे विवेचन करतो. तिङन्त प्रक्रिया म्हणजे धातुप्रक्रिया. संस्कृत भाषेतील धातूंच्या प्रांतात शिरले. म्हणजे धातू दोन प्रकारचे आढळतात. १) साधे धातू व २) तद्भव धातू. आदी, अंती किंवा मध्ये कोणताही विकार किंवा फेरबदल न होता ज्यांना मि, सि, ति ही सर्वनामे किंवा आमि, असि, अति ही सर्वनामे प्रत्यय म्हणून लागतात त्यांना साधे धातू हे नाव उत्तम शोभते. उदाहरणार्थ अद्, भू, शक्, हे धातू घ्या. यांची अत्ति, भूति, शक्ति ही रूपे किंवा अदति, भ्वति, शकति ही रूपे धातूला कोणताही विकार आदी, अंती किंवा मध्ये न होता, झालेली आहेत. उलट भू, शक्, वन्द, तृह, क्रौ, साध् हे धातू घ्या. यांची भवति, शक्यति, वन्दते, तृणेढि, क्रीणाति, साध्नोति, अशी आदी, अंती, किंवा मध्ये विकार होऊन रूपे होतात. या रूपातील भव्, शक्य्, वन्द्, तृणे, क्रीणा, साध्नो या अंगांना तद्भव म्हणावे लागते. कारण मूळ भू, शक्, इत्यादी धातूंत काहीतरी विकार होऊन ही अंगे बनतात. तसेच वर दिलेल्या भू, शक् वगैरे धातूंची भावयति, अवीभवत्, भाविषत्, भूयात्, भवेत्, बभूव, बोभोति, बोभूयते, बुभूषति, इत्यादी रूपेही मूळ भू धातूंत विकार होऊन भावय्, बीभव्, भाविष्, भूया, भवेय्, बभूव्, बोभो, बीभूय्, बुभूष, इत्यादी विकृत अंगांपासून बनतात. सबब, या भावय्, बीभव्, भाविष् इत्यादी धातूंनाही तद्भव धातू म्हणणे योग्य दिसते. येणेप्रमाणे संस्कृत भाषेत दोन प्रकारचे धातू आहेत. साधे व तद्भव पैकी साध्या धातूंचे विवेचन व पृथक्करण प्रथम करतो. ज्या धातूचे अंग स्वत: अविकृत धातूच असतो तो साधा धातू आणि जे अंग अभ्यास, द्वित्त्व, इतर धातूंचा जोड वगैरे विकारांनी आदी, मध्ये किंवा अंती मूळ धातूहून बदलेले असते ते अंग तद्भव धातु. साध्या धातुपासून तद्भव धातू ओळखण्याचे हे साधन आहे. शंका निघेल की भावय्, बीभव्, भाविष्, भूया, भवेय्, बभूव्, बोभो, बोभूय, बुभूष्, भू यापैकी अमुकच अंग मूळधातू व बाकीची अंगे तद्भव धातू ठरविण्यास काय प्रमाण आहे? भू हा मूळ धातू समजण्यापेक्षा, भावय् इत्यादी मूळ धातू धरल्यास काय बिघडते? भू ला वृद्धी होऊन व