Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२४६]                                      ।। श्री ।।            २१ सप्टेंबर १७६०.

पु॥ राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसी:

विनंति उपरि. दिल्लीहून वर्तमान आलें जे मराठे यांची फौज दिल्लीस येऊन जो फौजदार अबदालीचा होता याकूब अल्लीखान तो मात्र नावेवर बसोन पार होऊन पळाला. वरकड स्वार प्यादे चार पांच हजार मारले गेले. श्रीमंत स्वामींचे ठाणें दिल्लींत बसलें. घाट यमुनेचा आगरेयापासून कुंजपुरेयापावेतों श्रीमंत स्वामीचे हातीं लागले. याउपरि वर्तमान येत जाईल तें लिहून पाठवून. चौथे रोजीं सुजातदौले अबदालीजवळ गेले. त्यांजला अबदालीनें सांगितलें कीं तुह्मी मातबर. दोन करोड रुपयेयाचा मुलक तुह्यांखाले. त्यास मी हैराण, मजवर शिपाई यांची तलब चढली, याची तजवीज करून देणें. याप्रमाणें बोलतांच सुजातदौले सखेद जाहले. त्याजवर शाहावलीखान वजीर याजकडे गेले कीं मी तुमचे इमानावर आलों. आतां हें काय? त्यास शाहानवाजखान याणें जबाब दिल्हा की तुह्मी लुच्च्याचे सांगितल्यावरून आला. नदी उतरून कोण तुह्मांवर येत होता ? आह्मीं तुह्मांस इमान पाठविलें नाहीं. जसे आला तसे अबदालीस राजी करा. त्याजवर फजीत होऊन डेरा आले. नजीबखानानें अबदालीस सांगितलें कीं तुमचे कार्याकरितां सोय जशी सुजातदौले याणीं मागितली त्याप्रमाणें करून घेऊन आलों. आतां रुपये घेणें, सोडणें. हें वर्तमान सुजातदौले यांस कळलें. नजीबखानाशी व सुजातदौले यांस बिगाड झाला. सुजातदौले यांस करोड रुपये तूर्त मागतात, हें वर्तमान घनसुंदरदासानें लिहिलें आहे. घनसुंदरदास यास सुजातदौले याणीं नेऊन सर्व सांगितलें कीं मजला नजीबखानानें फसविलें. मजला श्रीमंत राजश्री भाऊस्वामींनीं व सरदारांनीं व गोविंदपंतांनीं, माझे आईनें, सर्वांनी सांगितलें की तुह्मीं न जाणें. त्याचें न आइकोन या कुंटणाचे बोलास लागोन आलों. फजीत पावलों. सारांश फजीत जाले. अबदालीचे लष्करी गडबड जाली. सर्व लहान थोरांनीं मराठे यांसि सलूख करून आपले देशास जावें हा मनसुबा आहे. याजउपरि लढाईची हिंमत त्यांत राहिली नाहीं. दहा हजार घोडे, उंट, खचर अनुप शहरीं मेले, नित्य मरतात. ईश्वरकृपेनें श्रीमंत स्वामीचें दैव थोर. आणि श्रीमंत र।। भाऊ स्वामी यशस्वी आहेत. सर्व उत्तमच होईल. आह्मी सत्वरच येतों. चिरंजीव र।। गंगाधरबावास सत्वर पाठविणें. वरकड जें वर्तमान येईल तें वरचेवर लिहून पाठवून. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. अबदालीचे घरी मनसुबा जाला, मराठे यांसीं सलुख करून वजीर गाजदीखान बकशी अहमदखान यासी करार करून आपले देशास जावें या मनसुबेयात आहेत. हे विनंति.