Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२४२]                                      ।। श्री ।।            ५ सप्टेंबर १७६०.

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं अंतरवेदींतील वगैरे तालुकियाची लावणी संचणी करावयास अनमानसा करून हेलसांड करितां. मामलत आपल्याकडे राहणार नाहीं हा संशय धरितां. कमाविशीचा मामला सबब कमी यावी, ऐशा डौलानें हयगय करिता. ह्मणोन बारीक बारीक शोध करितां विदित जाहलें. ऐशास, तुह्मी तों असें न करालच हा भरंवसा आहे. परंतु आपलेच तर्कानें एखादी भलती गोष्ट चित्तांत समजोन डावा डौल व्हावें ऐसें नसावें. या उपरि रयतेस दिल भरंवसा चांगला देऊन लावणी संचणी यथास्थित होय. पडली जमीन बिघराचा बिघा असेल तेहि लावणी होय. तुह्मी पेशजी बोललां आह्मां त्याप्रमाणें निदर्शनास येईल ऐसें करणें. काणेविशीं कोणाचें सांगितलें चित्तांत न आणितां बंदोबस्त ठीक करणें. पेशजी कित्येक कामें काजें तुह्मांस लिहिलीं आहेत. त्याप्रमाणें ठीक करणें. + जाणिजे. छ २४ मोहरम सुमा इहिदे सितैन मया व अलफ. लावणी करून जमा साधे. तुमचे बोललेप्रमाणें तरतूद होऊन येई. मक्ता होता तेव्हां मेहनत लावणी करीत होता. कमावीस झाली, आमचें येणें झालें. आतां लावणी पाडून तोटा नजरेस पडेसा करावा, असा शब्द न येई. चांगलें काम सरकारचें होय तें खातरजमेनें करणें. ऐवज जरूर पाठविणें. तुमचें येणें तूर्त उत्तम नाहीं. तिकडे सुज्यादौलाचे जमीदार अंतस्तें नीट करून ठेवणें. सोरबचे घाटीं नावा जमा करून रोहिल्याचे मुलकांत दबाव देणें. यामुळें रोहिले घरीं गेले ते येणार नाहींत. येथें आहेत ते मागें पाहतील. अबदालीचे फौजेंतील कांही लोक उठून येणार. दहा पांच हजारांचीं राजकारणें आहेत. तेहि तुह्यांकडेच जमा होतील. आपले मुलकांतहि दबाव राहील. असे कितेक उपयोग. यास्तव लिहिलेप्रें॥ करणे. इकडे न येणें. बंगसचे मुलकांत पुरता पायबंद देणें. ऐवज जरूर पाठवणें. मोठी मामलत असोन अगदीं ऐवज न यावा हा त॥ कामाचा नाहीं. जरूर पाठवणें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.