मोस्तर डूर्यतु साहेबानी महाराज साहेबास वोपिल्या वरून महाराजानी आपले निजाचा वर्तणूक इंग्रेज सरकारास व्यक्त होण्यास्तव महाराजानी विहित साक्षयुक्त रिसिडेंट मेस्तर डूर्यत् साहेबास सन १८०० ईसवी माहे २८ तारीखेस लिहिलें पत्र मेस्तर मजकूरानी पूर्वापार संदर्भ साक्षियुक्त हीं मनास आणून महाराजाचे निजत्व व महाराजाचे बरवी वर्तणूक हीं व खरेपण हीं इंग्रेज सरकारास चांगल्या रीतीनें जाणतें केले त्या वरून हा नरविलू कुंपनी वाल्यानी ते पाहून महाराजाचे कार्यास्तास पाठविणेसें निरोपिले. तेव्हा महाराजांनी दत्ताजी अप्पास व या अनुभोगांत असणार येक दोघांसहिं पाठविले त्यास योग्यतेनें बलाऊन घेऊन विचारून महाराजाचे निजत्वास मानवले कुपिनीवाल्यानी अपल्या स्वजातीवरी दृष्टी देयीनासारिखें श्रुत्धन्यावरच उभा राहून न्याय विस्तारविले तेश्लाघना करावें यास योग्य असे यारीतीच्या मक्लोटास संकट काळ प्राप्त जाहल्या समंई मक्कोटानी त्याची बायका मस्त्रिीस मक्कोट ह्मण्णारानींहीं संकट काळाचा विध जाणऊन महाराजास प्रार्थिले तेव्हां महाराजानी पेसजी महाराजाच्या बाध्येतेचा मजकूर कित्येक मक्कोटानींहीं कुंपिनास कळविले होते त्या उपकारास्तवहीं आपले थोर्वी करितांहीं पेसजी व मक्कोट ह्मण्णाराचे प्रार्थनेस्तवहीं प्रस्तुत मक्कोटानी केला उपकार देखील आठविनासें त्यास कांहीं अधीकच दहाहाजार रुप्पये देवविले. त्या वेळेस मेस्तर स्वार्चानी या अनुभवांत होत ते मेस्तर तारीख पादरी साहेबास मेस्तर जसाख पादरीसाहेबासहीं नीट कळल होतें त्याकरितां त्या उभयतांचे निज बोलणें महाराजाचे निजत्वास केवळ प्रबळ साक्षी होऊन हो त्याकरितां महाराजानी याउभयता पादरीसाहेबाचे खरें बोलणच्या उपकारास महाराज बत्ध जाहले. या अगोधरीच महाराजानी लग्न केले दुसरे स्त्री सौभाग्यवती अहल्याबाईसाहेब यांचे उदरी कन्यारत्न जन्मले त्यांस सुलक्षणाबाइसाहेब ह्मणून नाव ठेविले