त्यासरिसें शरफोजी राजे यांचे बाध्यतेची विचारणा निर्मल करावी ह्मणून इच्छिल्या समयीं शरफोजी राजे यांस त्याविषयीं तजाउरच्या पंडितानी निष्कर्ष केला पुस्तक कुंपणीस दिल्हें तेव्हां कुंपनिवाल्यानी अमरसिग यांस याविषयास विचारिल्यास अमरशिगयानी त्यास विरोध लिहून दिल्हे तोहीं घेऊन काशी वगैरे स्थळास पाऊन विचारणा करविलि शरफोजीराजे तंजाउरातच अमरशिंगाच्या उपद्रवा विरहित स्थळांत जाऊन राहतेसें निरोपिले राजेमजकूर हीं तदनुसार वर्तणूक केले तेव्हां मेस्तर स्वार्च साहेबानी पेसजी अमरशिंग यांस शास्त्र न जाणतां भयकडूनही कांहि आशेकडूनही लटक्या साक्षि दिल्ह्या बारा पंडितां पैकी मेले ते जातां वरकड पंडितानी आह्मी केल ते अन्याय ह्मणून मेस्तर स्वार्च पादरी साहेबास सांगीतले. तो अर्थ मेस्तर स्वार्च साहेब गौनरमेंटास लिहुन पाठविला तदनंतरें कित्येक दिवसावरी मेस्तर स्वार्च साहेब देवगतीस पावले तेव्हां शरफोजीराजास फार व्यसन जाहले. परंतू त्या मेस्तर स्वार्च पादरी साहेबांचे स्थानास मेस्तर जनीक पदरी साहेब आले त्यानी राजे मजकूराचा विचार वर्तुणूक चागलें कळून घेऊन पाहत अल्याकरितां त्या जनीक साहेबानी ही राजाचे ठाई फार अंतःकरण करून लागले तेव्हां त्या जनीक साहेबाचे स्नेहांत मेस्तर ठर्यन् साहेब ह्मण्णार रिसिडेंटीस आल्या करितां त्यांचे नीति व न्याय युक्त चलंतीही पहात येण्यावरून प्रतिपदिहीं राजास ते व्यसन शमन पावण्यास कारण जाहले,तदनंतरें इंगरेजी कु भी वाल्यांनी आपण करविल्या विचारिणेंत सर्व विधकडून हीं शरफोजीराजाची बळवंत ह्मणावयाचें जाणून तंजाउर रिसिडेंटीस मेस्तर, इर्यल साहेब यांसी निरोपून त्यांकडून प्रस्तूत अबाध्यतेकडून राज्यकरणार अमरशिंगानी अक्रावर्षे चुंगडी दिवर राज्य केल्यांत रयतासहीं सौख्य नाहींसे मुलुकांत रुजु मार्गे कडून पैका वसूल होणें नाहींसें वसुल जाहला पैका रुजू मार्गानें सरकारासही पावना मुळें मुशारदाराना मुशाराहीं न पावतां वे कुंपणीचे लोंकांचे खर्चास ह्मणून नेमिले