शिवाजी राजाचे हातास लागल्या मग आम्हास फार संकट जाईल; याकरितां तो राखावा म्हणून रुस्तूमखान् ह्मण्णार सरदारास बरोबरी जोर फौज पणाळा राखणेस्तव पाठविले; तो रुस्तूमखान् येऊन पावतो, इतक्यांत शिवाजीराजानी पणाळ हस्तगत केले होते । ते वर्तमान रुस्तुमखानाने अल्लीयदल्शाहास लिहिले ते पाहून अल्लीबदल्शहा फार व्यसनग्रस्त होऊन पणाळगडहीं शिवाजी राजानी साधिल्या; करितां याउपरी शिवाजी राजे आम्हास दुर्जय,बहुत राज्य बांधिले,बहुत फौजहीं जमला; आम्हा येकल्याच्यानें त्यांस जिंकवेना म्हणून, दिल्लींद्र अैसा औरंगजबास अल्लीयदलशहानी कागद लिहिले जे शहाजी राजाचे लेंक शिवाजीराजे केवलतुंद होऊन तुमचा व आमचा मुलूक बांधिला,तो मात्र नव्हता; अमचे तुरुकाचे मताचे जे देखिले त्यांस येकंदर मारिताती, मशीदा तमाम उपडून सांडिल्या, जडीत सिंव्हास येक करून त्यावरी आपण बसून अपल्यास बादशाहा म्हणविताहेत, आपल्या नांवे शिवशक म्हणून शक चालविताती ऐसें येकंदर उन्मत जाहले आहेत; आमच्या आटोप्यांत येत नाहींत,आमचे पणाळगडहीं स्वाधीन करून घेतले; यास्तव तुह्मी फौजा पाठविल्यानें अमची फौजहीं बरोबरी देऊन पाठऊन शिवाजीराजास ठांयांस आणितो, म्हणून लिहिले । ते पाहून अवंरगजबानी अनेक मोगलाई फौज बराबरी देऊन जुलुफकारखान म्हण्णार सरदास पाठविलें; त्या जुलुफकारखानानें अल्लीयदल्शहाकडील सरदार पहिलें पण। ळ राखणे पाठविले होते; त्या रुस्तुपखानासही मिळून घेऊन पणाळ प्रांतास बहुत सन्नाहनिशी उभयतां आले; तेव्हां शिवाजी राजे आपल्या फौजे निशी बाहेर निघून पुणें प्रांताकडे समेार येऊन जुलुफकारखान व रुस्तुमखानाची फौज तमाम मारून टाकून जुलूफकारखानाचा निशान हिरून घेतले । तेणें कडून सैन्य समग्र वाताहात होऊन जुलूफकारखान् पराजय पावून निघून गेला । दुसरा कित्ता जुलुफकारखा