शिवाजी राजे अमके ठांई आहेत म्हणावें याचें देखील कोणासहीं क.... नव्हतें । चंद्रराजानी सांगितल्यावरून अल्लीतदल्शाहास त्या शिवाजी राजाचा कृत्याचें ठांई आश्चर्य व असूया विशेष होऊन, सर्व प्रकारें शिवाजी राजास खालीं करावें, नाहीं तरी आपलें अधिपत्य टिकणें कठीण ह्मणून दृढ योचना करून, त्याचे बारा वजीरांपैकी अफजलखान मणार मुख्य वजीर,त्याला अब्दुलखान ह्मणून प्रसित्ध आहे.अफजलखानास बलाऊन, “ तुह्मी पादशाहाचें रफाक, मागें बहुत कामें केलां आहां, बहुत मुलुक साधिलां हो आहां, तुह्मा मूळ बादशाहास नांव आहे, अता शहाजीचा ल्योंक केवळ शिवाजी, उन्मत्त होऊन बापाची गोष्टीही ऐक नासें अपण अतिक्रमून, बाछाई मुलुके तमाम बांधून, बाछाई खजान्या.... न्यावयाचें द्रव्य लुटिले होते, नव्हतां प्रस्तुत बाजीराजा, कृष्णराजा जनकराजा यांचा मुलुक बांधून पलीकडें चंद्रराजाचा मुलुक जयवद्ध नगर प्रांत नाम जावळी ह्मणावेंयाचें स्थलहीं आक्रमून, समुद्रामधं किल्ला बांधून, शिवलंका म्हणून नांव ठेऊन, जडित सिंव्हासन करून आपण बसून, अपुलें शक देखील चालविलें । उपरी तो काय करिना या करितां तुम्ही विशेष फौज विशेष खजाना घेऊन, तुह्माबरोबर वजीर अकरा आहेत त्यांसहीं बरोबरी घेऊन जाऊन, बहुत बुत्ध.... शिवाजीराजातें धरावें, अथवा मारून तरी टाकावें, त्याविना अमुचा । काव होईना " ह्मणून सांगितल्यास अफजलखान कबूल होऊन सकल से न्यहीं अकरा वजीरास, कृष्णाजीपंत वकीलास बरोबरी घेऊन, निघणेर सित्ध जाहला । इतकियांत शिवाजी राजे पुनेस येऊन पावले ह्मणू वर्तमान आलें । तेव्हां चंद्रराजानें सांगीतलते शिवाजीराजे तेथून पुने आलते येक्या कामास बरेंच जाहलें । जावळी गडांत असलिया त्याच लाग करणें बहुत प्रयास । तो पुनेस आल्यां करितां परतून त्यानें येवोन् पावेतो इकक्यांत आह्मी पंढरपुरावरून निस्संग जावगडास जाऊन जावळी व प्रतापगड साधिल्यांते शिवाजी मैदानांत पडला ।