Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री. चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.

विनंती विज्ञापना ऐसजे. नबाबाचे कुच्याची घोहरत फार. या विषई दौलाचे माझे भाषण होते समई यो विषई संकटांत पडून बयान करून बोलू लागले. याचा तपसील बहुत आहे. ते वेळेस असे समजलें कीं षोहरत मुकामाची प्रगट केली, परंतु आंतील निश्चय कुच करण्याचा. तेव्हां स्वामीचे आज्ञेचे स्मरण होऊने दौलासी बोलिलों की “नवाब हैदराबादेहून बेदरास आले हेच ठीक नाही. तथापि येऊन एक वर्ष राहिले. आतां मावारे चालले. यांत लोक काय ह्मणतील? येवढे रईस यांची हरकत व्यर्थ होणे चांगलें नाहीं. त्यास ज्यापक्षी येथपर्यंत आले तेव्हां आतां हेच लाजम आहे की श्रीमंत पंडित प्रधान यांजकडील जुजवियातचे फैसले होऊन परभारें खुलासा करून भेटी व्हाव्या. नंतर नबाबांनी हैदराबादेस जावे. यांत शोभा. नाहीं तर कांहींच नाही. जर नबाबाचा आग्रह कुच करण्यांचा आहे तर याविशीं अर्ज करावा. येसे माझे मनांत' हे शब्द बोलताच दौलाचे मनास संतोष होऊन बोलिले की "माझे मनांतील गोष्ट सांगितली. वास्तविक नबाबाचे येणे येथे प्रकृतीकरितां हे खरे, परंतु येथून माघारे जाणे व्यर्थ होऊ नये तेव्हां त्यांस ह्मटलें कीं ' तुह्म प्रकृतीकरित असें ह्मणतां परंतु सर्व दुनिया बात असे कोणी ह्मणत नाहीं, अणिकचे काहीं बालतात. तेव्हां बोलिले कीं नानाप्रकारचे तर्क निघतात खरे. कोणी म्हणतात भोंसल्यावर दृष्टी आहे. कोणाचे ह्मणे राव शिंदे या साख्त आहे. याजकरितां येथे आले. मुरापुरकर यांजवर मोहीम इतकें. आणि याजपेक्षाही अधिक जे मनांत आणाल ते प्रकार यांत निघतात. आणि घाहरतही आहे. परंतु येक प्रकृति कारतां येणें जालें हे खरे. दुसरे कांही नाहीं त्यास आतां व्यर्थ षहरास जाणे हे माझे मनास प्रशस्त वाटत नाही. श्रीमंताकडील फडचे ठरून सफाई व भेटी होऊन उपरांत जावे अथवा श्रीमंताकडील गोडी संपादन करून त्याचे विचारे भोसले याजकडील कार्यावर असावे' या प्रों, बहुत विस्तारें बोलिले याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे त्याजवरून ध्यानात येईल. रा।छ रमजान हे विज्ञापना,