Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ संक्षिप्त २ तहकुब ३ शंका, किंतु ४शामियाना, कचरीचा तंबु.
अर्ज जाला. त्यास इस्तकबाल बादषाही बक्षीस पो. त्याजला तीन पारचे, दुषाला व स ( सि ? ) र पेंच दिल्हा. रात्रीं दौलाचेथें तयारी होऊन अर्जी गुजरली. च्यार घटिका रात्रीं नबाब जनान्या समवेत दौलाचे हावेलीस आले. मामुला इसमांचा सलाम जाला. मुजाहिदुदौला यांची मुलाजमत होउन नजर जाली. कंचन्याचा नाच होता. दोन प्रहर रात्रीं बरखास जाले. छ. ५ रोज रविवारीं तीन घटिकां प्रथम दिवसां नबाब बेदार जाले. दौलाची अर्जी ब दोन खाने व मेवा गुजरला. दिवसां दरबार जाला नाहीं रात्रीं मामुली इसमें हाजर होतीं. त्यास जबाब जाला. छ. ६ रोज सोमवारीं येक प्रहर येक घटिका दिवसां खाबगामध्यें नबाब बरामद जाले. जंगु व मुधा व मनवाचा सलाम जाला. लालन हजामाची याद केली. तो हजर जाला. हजामत होऊन येक प्रहर च्यार घटिकेत बरखास जाले. रात्रीं दौलाचे दिवाणखान्यांत बंदोबस्त होऊन सात घटिकेस जनान्यासहित नवाब तेथें आले, दौला व मीरआलम व सरबुलंदजंग व घासीमिया व अजमखां वगैरे इसमांचा सलाम जाला, प्रथम कंचनाचा नाच. त्यानंतर पना भांडाचा नाच होता. रावजीची याद केली. ते दरबारास आले. फुलाचे हार येक रावजीस व येक दौलास नबाबांनीं दिल्हे. दोन प्रहरास बरखास जाली. छ ७ रोज मंगळवारी प्रात:कालीं दौलाची अर्जी व दोन खानें मेवा गुजरला. लंगर हवदाचे फकीरानें पांच टोपली अनार गुजराणिणे ( ले ? ) दौलाचे घरीं रंगाची तयारी करऊन यक प्रहर यक घटिका दिवसां नबाब जनान्या सहित तेथें आले. बंदोबस्त जाला. कंचन्याचा नाच होता. रंगाच्या पिचका-या घेऊन मारगिरी जाली, यक प्रहर सात घटिकेस नवाब आपले हवे लीस आले. रात्रीं दौलाचे हवेलींत तयारी जाली, नबाबही येणार होते. परंतु, झुलकारअली साहेबजादे यांची मातुश्री हैदराबादेंत बेआराम होती, तिचा वाका जाल्याचें वर्तमान शुतरस्वारासमागमें आलें. सा नबाबाचें येणें न जालें. छ. ८ रोजीं बुधवारीं प्रातःकालीं दौलाची अर्जी गुजरली. रंगाची तयारी करण्याचा हुकुम त्यांजला जाला. साहेबजादे मीरपोलादअली वगैरे यांची १ शय्यागृह २ सांडणीस्वार.
याद केली. ते हजर जाले, येक प्रहर साहा घटिका दिवसा नबाब दोलाचे हवेलीस आले. दौला व सरबुलंदजंग व घासीमियां व अजमखा व रावरंभा तमाम सरदार मनसबदार मुतसदी लोकांचा सलाम जाला. रावजीकडे चोपदार पाठविला. तेही दरबारास आले. कुर्सीवर नबाब बरामद जाले. संर्वाचे हातीं पिचका-या देऊन रंग टाकिला. कंचन्याचा व भांडाचा नाच होतां.. दोन प्रहर च्यार घटिकेस बरखास होऊन नबाब आपले हवेलीस गेलें. रा छ, ११ रा खर हे विज्ञापना.
कार्तिक शु. १४ शनिवार कशे १७१५. ता०१६ नोव्हेंबर १७९३. छ १६ रोज टप्यावर रवाना.