Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५७२ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधरपंत स्वामीचे सेवेसी :-
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ १५ रजब यथास्थित जाणोन स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर कळलें. नाक्याच्या अमलाविसी लि॥. त्यास, श्रीमंतांस सविस्तर विदित केलें. आज्ञा जाली कीं, तूर्त जाबसाल होत नाही ; राजश्री रघुनाथपंत दिवाणजी आले, ह्मणजे समजोन सांगणें तें सांगू; तूर्त जसें चालतें, तसें चालवावें. त्यास आपण उपाध न करावी. दिवाणजी आले ह्मणजे जाबसाल होईल. कळावें. आपण छावणीकरितां लि॥, त्यास, आह्मांस श्रीमंत तात्याच्या कृपेचें प्रयोजन आहे. आणखी हेत ठेवीत नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति.