Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ५२१ ]

श्री.

तीर्थरूप राजश्री दादा वडिलांचे सो।.

अपत्य पुरुषोत्तमानें सा। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता। छ ७ मेहरम मुकाम इंद्रप्रस्थ वडिलांचे आशीवादेंकरून यथास्थित असे. विशेष. पूर्वी सविस्तर वृत्त दररोजचें सो। लिहून पाठविलें असे, तें पावून सकलार्थ विदित जाला असेल. विशेष. आज छ मजकुरीं वजिरास पातशाहापाशी आणून मीरबक्षीकडून अकबत महमुदासहित, व समस्त मंडळीस – जे सलुख करणार त्यांस किल्यांत पातशाहाचे मातुश्रीसमीप नेऊन, प्रातःकालपासून सायंकालपावेतों ज्या ज्या युक्तीनें समजावणें, तें समजाऊन, लडाईचे पल्यावर आणून समस्तांचे मोहरेनशीं शपथपूर्व पातशाहास लिहून दिधलें कीं, सलुख करीत नाहीं; लडाई निश्चयात्मक करितों. पूर्वीच करार ठैरला होता की, सा लक्ष रुपये द्यावे; व रोहिले वगैरे जे तंग करितात, त्यांस समजवावें. ते रु॥ पातशाहांनी देऊं केले. व पुन्हां रुपया न मागावा हा मुचलका घेऊन रुपयांची निशा केली. व लूट ठैरिलियावर हरगोविंद माधोसिंगजीचे तर्फेनें येऊन सांगू लागले कीं, उद्या मर्हाटे येऊन पन्नास लाख रुपये मागत बसले. तेव्हां कोठून द्याल ? ते समयीं पातशहास संशय येऊन आह्मांस ह्मणूं लागले की, जर तुह्मी आह्मांकडून लडाई करवितां, जर तुमचे खाविंद येऊन सलुख करवितील, अथवा आह्मांस रुपये मागतील, तेव्हां आह्मी कोठून रुपये आणावे ? यास्तव तुह्मी साफ आह्मांस लिहून द्या की, श्रीमंत रघुनाथराउ आलियावर सलुख करणार नाहीत; व सख्य करणार नाहींत; व बेसन रुपयाहि मागणार नाहीत; व वजिर बक्षीसी शामील होऊन सफदरजंगास व जाटास मारावें; व त्या उभयतांचा जो माल येईल तो निमेनिम पातशाहास देऊं व निमे आह्मी घेऊं. याप्रों। लिहिलें द्याल तर, आमची खातरजमा होईल. व नगनगोटे मोडून सा लक्ष रुपये देऊन, श्रीमंत दादासो येत तोंवर थांबवूं ; नाहींतर, आह्मी आपल्याकडून त्याची तकशीर माफ करून जाटासहि त्याचे मुलुकास वाटें लाऊं. कां कीं, त्याचें येणें जालियावर आह्मी अधिक बलायेंत पड़ल्यास आह्मांस काय सुख ? मुलुख सर्व तुह्मी घेतला ! आतां हा किल्ला येऊन मागाल तेव्हां आह्मी काय करावें ?