Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४९९ ]
श्री.
विज्ञप्ति कीं, स्वामींनी कृपा करून मतलबवार दसकत केले पाहिजेत.
बापूजी महादेव लाहोरी स्वामीसेवेवर आहेत. त्यांची चौ वर्षांची तलब राहिली. ते हरकोठें तनखा करून देऊन पुढें नेमणुकीचे ऐवजास स्वदेशीं एखादा माहाल करार करून देणार स्वामी समर्थ आहेत.
सेवकास स्वामी कृपेची उमेद मोठीच आहे. हजूर राहून चाकरी केली असती तर, आजी पाच सात हजार फौजेची सरदारी स्वामीच कृपा करून देते. देशी स्वामीचे प्रतापाची चाकरी केली तिकडे फिरोन जावयाची आज्ञा होते. त्यास, दोन हजार स्वारांची नेमणूक करून, ऐवजाची स्वदेशी जागीर देणार स्वामी समर्थ आहेत.
मौजे, अंध्रोटे पा। दिंडोरी हा गांव सेवकाकडे पूर्वीपासून. तो गांव सांप्रत जुन्नरकरांस दिधला. त्याचे ऐवजी दुसरा गांव त्या जमेचा नाशिक परगण्यांत देविला पाहिजे.
सेवकाचा खर्च भारी ! अमद कांहींच नाहीं ! कर्जदार होऊन आजवर गुजराण केली !! आतां स्वामीनीं कृपा करून नेमणूक खर्चाची करून दिधली पाहिजे.
सेवकाकडे आसाम्या सरकारांतून पूर्ववतप्रो। चालत आल्या, त्या कृपाळू होऊन चालत्या करणार स्वामी समर्थ आहेत. ---
१ बुंधेलखंडची मजमू.
१ पा। नाशिकची फडणिसी.
१ पा। आवडे येथील दत्परदारी.
२ किल्ले रामसेज येथील:--
१ सबनिसी
१ सुभेदारी
------
२
-----
५
मौ। चांधोरी पा। नाशिक येथील पाटिलकी सरकारांत जप्त आहे, याची गुमास्तागरी सेवकाकडे चालत आली. पूर्ववतप्रों। गुमास्तागिरीचें काम करार करून देणार स्वामी समर्थ आहेत.