Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ४८६ ]

श्री.

पौ। छ २ शाबान

श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी. बापूजी महादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १० माहे रमजान मुकाम इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. तुमचीं पत्रें जबाबी कासदासमागमें. जरवचे मुकामचें + ++ व कालाबागेचे छ २१ शाबानचें आले, तें छ ९ + + मजकुरी पावोन लिहिलें वर्तमान कळों आलें. लिहिलें की, सरदारास दक्षणचें काम भारी; फौज किमपि न पाठवावी. शंढाचे वचनीं गुंतलों तें सत्य केलें पा।. याजकरितां बहुतां प्रकारें समजाऊन अंताजी माणकेश्वर व भगवंत अनंत यांस तैनात करून घेऊन रोजमरा व समजाविशीच्या वराता आपल्यावरून घेतल्या. गाजुद्दीखानाचा ऐवज, व अंतरवेद, व जाटाकडील बाकी वसूल करून रोजमरा देत जाणें; हे सू (ज्ञ ) मनुष्य आहेत; यांजला बहुत सावधपणें वर्तवीत जाणें ; ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐसियासी, जाट व रजपुत यांणी एकी करून बख्तसिंगाचे कुमकेस फौज पाच सात हजार पाठविली आहे. रामसिंगाचे नेस्तनाबूद करून दक्षिणीयांही पुढें शोखीच्या गोष्टी सांगितल्या तर, सन्मुखही व्हावें ऐसें ज्यांचे मानस ते जाट कशी मामलत आपल्यासी करितील ? दो अड्चा हजार + + + अंताजीपंत आले ह्मणून केव्हां दबणार ? जसा जसा रंग पडेल तसे करावयाचे ते करूं. सांप्रत अमीरुल उमराव बहादुर यांणी इमादुनमुलूक बहादुरास लिहिलें जेः-- अंताजी माणकेश्वर मजला येऊन भेटले. त्यांणी येऊन सांगितलें जें, रामचंद्रपंत दामेदरपंतावर बापूजीपंतावर नाखूष आहेत. याकरितां सरदारांनी मजला रवाना केलें. त्यासी मजला जसे मल्हारराव आहेत, तैसें करावें. आमचे कामांत बापुजीपंतास दखल न द्यावा. त्यावरून म्यां त्यांजला कौलअहद दिधला. व पांचसे अशरफी मेहयानी व खिलाअत, व जवाहीर, व घोडा वगैरे दिधलें. त्यासी तुह्मीं जाऊन नवाब बहादुरास सांगावे जें, जसें मल्हाररायास जाणतां, ऐसेच अंताजीपंतास जाणावें. आणि तुह्मीं वालाशाही वगैरे वगैरे तमाम एकत्र करून दाहा कोसांवरी जाऊन, घेऊन येणें. आणि राजे फलाणीयांस दजाल न देणें. हें वर्तमान नवाबबहादुरांस अकबतमहमूद यांणी सांगतां त्याजवर कोप केला. आणि हें ह्मटले जें : ज्या + + नी तुह्मांस केलें, त्यांजला अंताजीपंताबरोबर केले. ज्या वकिलांनीं तुह्मांस असफजाहाचे पुत्र करून दाखविले, त्याजला दखल देऊ नका ह्मटलें, तेव्हां तुमच्यानें काम होणें कळतच आहे. बिलफैल, डासणा कुरजा वगैरे जे दामोधरपंतांनीं फर्द लिहून दिधली, त्या ऐवजांत देणें ह्मणून सांगितलें. आह्मीं नवाबास ह्मटलें जेः- नवाब अमीरुल उमराव आह्मांस श्रीमंतासारखे, सरदारासारखे. इमामुन्मुलुक आमचा साहेबजादा, आपला लडका. आह्मांतें ज्याप्रों। लिहिलें त्याप्रों। करावें; आणि काम पातशाही करावें. त्यासी, तुह्मी नवाबास सांगा जे, आह्मी गुन्हेगार आहों, तरी तुमचेच
आहों ! तुह्मांस कामें बहुत थोर करणें; थोरथोरांशीं स्नेह ह्मटल्यास वजीर नवाब बहादुर वगैरे खैरखाहा आहेत तें कळलेंच आहेत. मगर आह्मीं बरेवाईट सरदारांचे, पंतप्रधानाचे, अथवा त्या + ++ + खुष करून आमचें बरेंच पाहिलें. त्याची तदारुख हापावेतों या रीतीनें त्यास गोष्टी सांगणे त्या सांगाव्या. नीट वाटेनें चालतील तरी उत्तम. नाहींतरी आह्मांसी अपकार करितील. त्याचा तदारुख ईश्वर करील. सरदारांस ह्मणावें जे, त्या भंडारियासी समजाऊन सांगा. नाहीं तर, शिलेदारीच्या गोष्टीनें मलत्या कोठें तोंडांत खाईल. आमचें नांव बदनाम होईल. बल्की, रंगरायासारिखा आला तरी उतम आहे. नाहीं तर यांणीं लबाडी केलियावरी आह्मांस संकट इतकेंच जे, हे पादरक्षाप्रयोग खातील, हें सांगणे. निजामन्मुलुकासी आमचा उपाय चालत नाहीं. कां ह्मटल्यास ? आपण यासाठी ईश्वरापाशीं याचे दुशमनावर मारणप्रयोग केले, जाहीरचे प्रयोग ऐसे केले जे अद्याप हैदराबादेहून उकसूं सकत नाहीं. ऐसें असतां हे + + तील तरी याजला ईश्वर समजो. खाविंदा + + + दया सरदारांची, याकरितां मात्र, मुखत धरावी ; नाहींतर, पाव घटकेंत बेमनसबा करून दुनियांत नाराज राहे तें करणें कांहीं काम नाहीं. न करावें तर, जंजाल्याचीहि मसलहत सरदारांसच पुसावी. जर आह्मांसी नीट न राहिला तरी, सरदाराशीं नीट काय राहील ? असो ! आपला केलेला विचार आहे त्याजवर आपण कायम असावें. याजला खबरशर्त करीत जावी. नवाब बहादुरांनी पत्रें पाठविली तें पावतील. बहुत काय लिहिणें ! लोभ असो दीजे. हे आशीर्वाद. रा॥ त्रिंबकपंत यासी नमस्कार विनंति उपरि. चिरंजीव बंडोबाची चिंता न करणें. हे विनंति.

सो। गिरमाजी मकुंद कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. सनदाच्या नकला काजीच्या मोहरेसी पा। आहेत. पावतील. हे विनंति.