Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४२६ ]
श्री शके १६८८ आश्विन वद्य १३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तम माहादेव यांसः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी विनंतिपत्र छ १६ जमादिलावलचें पाठविलें तें पावलें. अहमदखान कुंजपुरास गेले ते छ १९ रोजी येणार, आल्यानंतर आपल्या पुत्रास फौजसुद्धां हुजूर रवाना करतो ऐसा त्यानीं करार केला आहे, ह्मणून लिहिलें तें कळलें. उत्तम आहे. त्याणीं आपले लेंकास अद्याप पाठविलें नसेल तरी त्यांचे लेकास व हाफीज रहिमतखा यांचे लेकास फौजसुद्धां सत्वर घेऊन येणें. तोफा व जंगी सामानाची तरतूद त्यास सांगून तुह्मी करवीतच आहा. त्यास, तेंहि जलद करवणें. अनुपगीर गोसावी याजकडील राजकारणाचा मजकूर लिहिला. पैशास तुह्मी तूर्त त्यासी करारमदार न करणें अथवा नाहीं असेंहि न बोलणें. दाबूनच ठेवणें. राजकारण न तोडणें. वरकड कितेक मजकूर विस्तारपूर्वक लिहिला तो कळला. जाणिजे. छ २६ जमादिलोवल, सु॥ सबा सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखना
वधि.