Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९६ ]
श्री शके १६८० फाल्गुन शु॥ १५.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील ता। छ १३ रजब जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. रोषनद्दौला याच्या लेकाची मामलत केली असेल तरी त्याला रुपये द्यावे. नाहीं तरी, त्याचा कागद तुह्मांपाशी आहे तो माघारा द्यावा. सांप्रत त्यांजला ऐवजाची निकड आहे. जर तुह्मांस त्याची मामलत करणें असेल, तरी थोडाबहुत ऐवज तूर्त द्यावा. राहिलासाहिला ऐवज मुदतीप्रमाणें पाववावा. कदाचित् मामलत करणें नसेल तरी त्याचा कागद अविलंबें पाठवून द्यावयाची तजवीज करावी. जरूर जाणून लिहिलें आहे. * यांचा ऐवज लौकर पाठवावयास अनमान कराल. तरी माझी शपथ असे. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.