Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८५ ]
श्रीवरद शके १६८० आषाढ वद्य १३.
सहस्रायु चिरंजीव राजश्री तात्यासः--
प्रति बापूजी माहादेव व पुरुषोत्तम महादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल छ २६ जिल्काद जाणून, तुह्मी आपलें क्षेम हरघडीं लिहीत असलें पाहिजे. विशेष. तुह्मी गेलियाता। कांहीं वर्तमान कळत नाहीं; याजकरितां चित्त उदास आहे. तर आलिया माणसासमागमें पत्र पा। संतोषवीत जाणें. यावरी आमचें वर्तमानः आह्मी श्रीमंत राजश्री दादासमागमें आहों. चिरंजीव राजश्री नानाची रवानगी राजश्री जनकोजी सिंदे याजसमागमें केली, व चिरंजीव गणपतराऊ व राजश्री त्रिंबकपंत यांसी दिल्लीस रा। केलें. सांप्रतें श्रीमंतांची कृपा आहे. जनकोजी सिंदे शाहापुरियापासून रुखसत जाले. हिंदुस्थानचे मुखत्यार आहेत. पुढें सविस्तर मागून लिहूं. श्री कृपा करो ! हे विनंति.
पौ। छ २६ माहे जिल्हेज.