Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ३६७ ]

श्री शके १६७८ फाल्गुन वद्य ११.

पु॥ राजश्री दामोदर महादेव व पुरुषोत्तम महादेव गोसावी यासीः--

उपरि. तुह्मीं लिहिलें कीं, थोरल्या फौजा येत तों, राजश्री समशेरबाहादर, व नारो शंकर, व अंताजी माणकेश्वर, व जाठ, व बहादूरखान पठाण, वगैरे. एक करून अबदालीस ठासून राखावा, ऐसा आह्मीं, व नागरमल्ल, व जुगुलकिशोर, व वरकड उमदियांनी विचार केला आहे; आह्मीं समशेरबहादर याजकडे जातो; ह्मणोन लिहिलें, तें कळलें. उत्तम आहे. तुह्मी चिरंजीव राजश्री समशेरबहादर याजकडे गेलांच असाल. नारो शंकर, समशेर बहादर, अंताजी माणकेश्वर, व जाठ वगैरे एक केलेच असाल. करणें. चिरंजीव राजश्री दादा व मल्हारबा मातबर फौजेनें तिकडे येतच आहे. तूर्त तुह्मीं अबदालीस ठासून राखावयाचें केलें आहे. त्याप्रों। करणें. त्यास पैस घेऊं न देणें. एतद्विषयीं चिरंजीव लिहितील, तसा मनसुबा करणें. छ २५ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ?

( लेखनसीमा. )