Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२४९ हिंगणे ॥ श्री ॥
शके १६७० श्रावणवद्य १३ पौ। छ ३० शाबान.
राजश्री बापूजी महादेव व राजश्री दामोदर महादेव गोसावी यासीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥.
मलारजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अर्थ ध्यानास आला. दिल्लीचें सविस्तरें राजचर्येचें वर्तमान लिहिलें; आणि सादतखानाच्या मर्जी कुमक च्यारपाच हजारांची पाठवावीं ऐसीं घेऊन ठेविलीं. प्रतिउत्तर आलिया तजवीज करून. ह्मणून पत्रीं लेखन केलें. ऐशास, आपले स्वहिताचा मनसबा देखिला, तो तुह्मी त्यांची मर्जी घेतली हे गोष्टी प्रसंगास उचितच आहे. इकडील वृत्तांत तरी:- पूर्वी या प्रांतास आलिया दोन तीन पत्रें तुह्मांस लिहिलीं त्यावरून अर्थ कळलाच असेल. राजे ईश्वरसिंग यांणी लटकी रदबदल दोन महिने लावून आपल्या फौजा तमाम मेळवून युद्धप्रसंग करावा ऐसा त्यांचा विचार देखोन, रा॥ गंगाधरपंत याजबरोबर फौज देऊन फागईच्या मुकामीहून जैपुरास रवाना केलें. त्यासी. आषाढ वा। २ स आपली फौज जाऊन, शह-सभोंवती उभी राहून, भोंवताल्या वाड्या होत्या त्या जाळून दोन प्रहर तालिया तेथून दोन कोस अलीकडे येऊन मुकाम केला. त्यासी, राजियाचें जाट, सेखावद, नरोके, राजावत, व राय केशवदास अवघे सरदार याजबराबर फौज देऊन, आपली फौज राहिली होती तेथें चालून आलें. आपली फौज तयार होऊन, दोहीं फौजांसी गाठ पडून युद्ध चार घटका जालें. आपल्या कडील +++ कामास आला. आणखी चांगले माणूस त्याजकडील शेदीडशे ठार जालें, दोनतीनशे जखमी जाले. कछवे सिकंदे करून, माघारे जैपुराशेजारी नेऊन घातले. तेव्हां त्याजला भारी मनसबा पडून, अवघे सरदार, ठाकूर, राजा, एकत्र होऊन, मसलत ठरावून, खासी राजे यांणी बाहेर निघावे, ऐसा निश्चय करून आषाढ व॥ ६ स बाहेर राजे ईश्वरसिंग निघाले. यापरि, जालें वर्तमान पुरवणी पत्रीं लिहिलें आहे त्यावरून कळों येईल. छ २५ शाबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति