Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३९ ]
श्री. शके १६६१ आषाढ शुद्ध ११.
राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यासि आज्ञा केली ऐसी जे :-
स्वामीच्या राज्यांतील स्थळें, किले, व जंजिरे, व ठाणियाच्या कारखानिशा, व सरदारांकडील चिटणीसी, व जमेनिसीचे धंदे, राजश्री जिवाजी खंडेराव चिटनिवीस याचे आजे बाळाजी आवजी यासि कैलासवासी थोरले महाराजांनीं वंशपरंपरेने करार करून देऊन चालविले. त्याप्रमाणे चालतच आहेत. ऐसियास, फिरंगाण वगैरे तालुके तुह्मी सोडविले, व पुढें सोडवाल. तेथील किले में जंजिरे व ठाणियाच्या कारखानिशीचे व सरदारांकडील चिटणिसी व जमेनिसीचे धंदेयाचे कामावरी मारनिले आपले निसबतीचे कारकून पाठवितील, त्यांचे हातून कामकाज घेऊन, चालवीत जाणें. बाळाजी आवजी व खंडो बल्लाळ यांणी स्वामिसेवा निष्ठेनी करून, बहुत श्रमसाहास केले आहेत. यास्तव, यांचे परंपरेने चालवणें अगत्य हें जाणतेच आहा ; तदनुरूप चालवीतही आहातच. जाणिजे. छ० ११ रविलाखर सु॥ अर्बैन मयातैन व अलफ. * खास दस्तुर याचे हातून सेवा घेने. बहुत लिहिणे तर, सुनद असा.