Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ११५ ]

श्री. शके १६५९ भाद्रपद वा। ३०.

राजश्री गंगाजी नाईक अणजोरकर व शिवजी ना। अणजोरकर यांसः-

 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ समान सलासीन मया अलफ. सांप्रत वसईवरी हल्ला जाहली. तेसमई कार्य न जाहालें ह्मणून तुह्मीं कांहीं मनांत दिलगीर न होणें. शाबास तुमची कीं तुह्मीं मन वाढवून मेहनत उत्तम प्रकारें केली ! ज्यांणीं साहेबकामाच्याठाईं मन वाढवून कामकाज केलें आहे, त्यांचें सर्व प्रकारें ऊर्जित केलें जाईल; व कोण्ही साहेब कामावर ठार जाला असेल, त्याचे मागें मुलामाणसाचें चालविलें जाईल. कार्य आजी न जाहालें, तरी पुढें तुमचे हातून घेतलें जाईलं. तुह्मीं आपलें समाधान असों देणें. जाणिजे. छ. २८ जमादिलवल. बहुत काय लिहिणे ?
लेखन
सीमा.

० श्री ॅ
शाहू नरपति
हर्षनिधान बा-
जीराव बल्लाळ
प्रधान.