Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०५ ]
श्री. शके १६५७ पौष वद्य १३.
राजश्री बापूजी माहादेव गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। यशवंतराउ पंवार दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लि॥ गेलें पाहिजे. विशेष. जयगोपाळ मुनशी याजकडे आह्मीं कडीं सोन्याची ठेविली होती. त्यास, तीं कडी तुह्मी त्याजपासून घेतली आहेत. ऐसियासी, त्याऐवजेपैकी बद्दलदेणें रदकर्ज उदेपुरीरु॥ ९५० साडेनवशें देविले असेत. तर सदरहू रु॥ सिवदत्तपुरी गोसावी याच्या पदरी घालणें आणि पावलियाचे कबज घेणें. साडेनवशें रुपये गोसावी मजकुरास जयनगरीं देणें. अनमान सहसा न करणें. याचा गुरु त्या प्रांतीं शिव जाला आहे. याजकरितां साडेनवशें रु॥ खामखाये देणें. बाकीचा ऐवज तुह्माकडेच राहूं देणें. रा। छ० २६ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सूध.
० श्री ॅ
भवानी शंकर चरणी
तत्पर आनंदरावसुत
यशवंतराव पवार
निरंतर. बार.
शके १७९२.