Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४० ]
श्री. शके १६५१ श्रावण शुद्ध १.
राजश्री अंबाजीपंततात्या गोसावी यांसिः-
सकलगुणालंकरण अखंड़ितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। दावलजीराव सोमवंशी सरलष्कर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिलें पाहिजे. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ कळला. सनदापत्रांविसीं कारकूनासी बोलावें लागतें. तो ऐवज नेमून लेहून पाठवणे. त्यासारखी बोली करणें ती करूं. व रामाजा दामोधर यांचे शंभर रुपयांची निशा होय, तें करणें. व चोपदारास खर्चास द्यावें लागतें त्याची बेगमी करून पाठविणें, ह्मणोन लिहिलें तरी कारकुनासी जे बोली करणें ते आपण करावी. त्यास पैका आह्मी बिलाकुसूर पाववूं. सनदापत्रांकरितां तट जाला आहे. राजपत्राचा उजूर करितात कीं राजपत्रें दाखवून अंमल करणें. तरी राजपत्रें सत्वर सिध करून पाठविलीं पाहिजेत. राजश्री रामाजी दामोधर यास रुपये १०० संभर सुभाचेऐवजीं देवविले आहेत. पावतील. चोबदारास द्यावयास वीस पंचवीस रुपये लागले तरी हरकोणाचे घेऊन आपण द्यावे. आह्मी प्रविष्ट करून. आमचें वर्तमान तरीः नवे लोक जे ठेवणें ते ठेवीत आहों. यास पक्ष येथेंच लागेल. हें वर्तमान आपणांस कळावें यास्तव लिहिलें असे. आमचा विचार जो आहे तो आपणांस विदितच आहे. रुपयांस जागा नाहीं, कर्जवामही मिळेना, ऐसा प्रसंग आहे. तरी, आपले विद्यमानें कर्जवामाची तरतूद होईल तरी करून आह्मांस लिहावें. आह्मीं खतें करून पाठवून. निदान कोठे रुपया न मिळे यास्तव आपणांस लिहिलें असे. आह्मांस जैसे तीर्थरूप तैसे आपण. असेल वर्तमान तें आपणांस सांगावें, या करितां लिहिलें असे. हरसूल, इंदापूर, व वासीम, वगैरे माहाल यांचा मुबादला राजश्री स्वामींनी घ्यावयाचें मान्य केलें आहे. तरी आपण राजश्रीस विनंति करून मुबादला जें करून घेणें तें करून घेतलें पाहिजे. राजपत्रें गढें व बुंधेलखंड व अजनुज देखील कुल येथें सत्वर पाठवावीं. व राजश्रीं आनंदराव सुमंत यांस सांगेन सदाशिव माहादेव सबनीसीस न ये, तें करणें. तो आला तरी त्यास आह्मी सोबतीस ठेवणार नाहीं. दुसरा पाठवतील, तर चालवूं. कळलें पाहिजे. रा। छ. २९ जिल्हेज. राजश्री सिदोजी निंबाळकर यांणीं मनमाने तैशी पलीकडे वागमोडीयांच्या व वरकड आह्मांकडील सरंजामांत रोखे करून धामधूम मांडली आहे ; ह्यामुळें त्यांचा आमचा कथळा होईल. तरी, त्यास हुजरून ताकीदपत्रें जाऊन ते कथळा न करीत तें करावें. इतकें असोन याउपारि त्यांणी कटकट केली तरी त्याचें पारपत्य करून. व सनदा राजपत्रें सत्वर पाठविलीं पाहिजेत. छ. मा।र. बहुत काय लिहिणें ? * * हे विनंति.
मोर्तब
सूद.
० ॅ
श्रीराजाशाहुछत्रपति
स्वामिचरणितप्त-
र दावलजी सोमोसी
सरलश्कर निरंतर.
मोकदम मौजे दिये
संभाजीचा लेक.
वाडीकर संभाजी बिन संताजी.