Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

श्री.

सहस्रायु चिरंजीव विजयीभव राजमान्य राजश्री जगोबा व रा। रा। नाना यासी.

प्रति मोरो विश्वनाथ आशिर्वाद उपरि येथील वर्तमान भाद्रपद शुद्ध ३ मंगळवारपावेतों यथास्थित असे. विशेष. गकारपूर्वक आपले यजमान त्यांचे पित्रव्य सकारपूर्वक हे मोरगांवास उदईक येथून स्वार होऊन जाताती. ऐसियासी, हे तेथें गेले ह्मणजे हे व एकबोटे ऐसे एकत्र होऊन बखेडियास मिळतील, ऐसा अर्थ जाणोन हा कागद तुह्मांस लिहिला असे. तरी तुह्मापाशीं काकाजी विनायकाचा कागद दिधला आहे तो तांतडीनें त्याजपाशीं देऊन लोकेषणा होये ते गोष्टी न करणें. तुह्मीहि सुज्ञ आहां. आपल्या कागदाचा भार जाय तो अर्थ न करणें. आपला दस्तऐवज दुसर्याच्या हाती पडोन आपल्यास मूर्खत्व नये ते करणें. व तुह्मीहि हरएकविशीं धीर धरून, जें कर्म करणे तें भार रोखोन करणें. फार विस्तारें ल्याहावें तरी शहाणे आहा. या दिवसानें दिवस उगवला ऐसें नाहीं. बहुत काय लिहिणें ? लोभ असो देणें. हा आशिर्वाद.