Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

माघमास.
शुद्ध १ गुरुवारी वितिपात, अठेताळीस घटका. ते दिवशीं नाना पुरंधरे यांची सून पलशीअळकुटीस वारली.

शुद्ध २ शुक्रवारी मुंजी लग्नें रोजमजकुरींच देवकप्रतिष्ठा करून लग्नें लागलीं. बि॥.
१ माधवराऊ विश्वनाथाच्या पुत्राचें.
१ गंगाधर बाजी देशपांडे यांच्या पुत्रांची.
१ जगन्नाथ अनंत व बहिरो कृष्ण यांच्या पुत्रांच्या.
१ राजश्री धोंडो मल्हार देशपांडे सासवडकर याच्या पुत्राची सासवडीं जाली.
--------

शुद्ध ४ रविवारी राजश्री सटवोजी जाधवराऊ याची स्त्री, सोदेवजी ताकपीर याची कन्या, चिखलीस रोजमजकुरी प्रातःकाळीं वारली.

शुद्ध ५ सोमवारी राजश्री नाना पुरंधरे याची सून पलशीअलकुटीस शांत जाली ह्मणोन सासवडीं खबर आली. मुंजीचा पळसुला मुंज्या, मुलाजवळून करविला. व गोपाळ माळीहि रोजमजकुरीं शांत जाले. रुजू. षष्ठी मंगळवारीं वारले.

शुद्ध ६ मंगळवार. रोजमजकुरीं गोपाळ माळियास देवआज्ञा जाली.

वद्य १ शुक्रवार, गणपतराव बहिरव सासवड़ी वारले.

वद्य २ मंदवारीं, पांडुरंगाच्या लग्नास चिंचवडोस आबा वगैरे अवघीं घरचीं गेली. व उदाजी शितोळे यानीं आपली लेक खंडोजी समशेर याच्या पुत्रास दिल्ही. लग्न अवसरीस केलें, रोजमजकुरीं.

वद्य ३ रविवारी पांडुरंगाचे लग्न चिंचवड़ीं दिवा विसा घटकाचें जालें. श्रीभास्करबावा देव याची कन्या केली. परशरामपंत कोठूरियाहून आले. त्यानींच देवकप्रतिष्ठा केली.

वद्य ९ सह १० मंदवारी खंडो विसाजी देशपांडे यांची कन्या शिवापुरी अत्र्यांचे घरीं दिल्ही होती. लग्नास आठ रोज जाले ते दिवशीं वारली. वेथा काय जाली ह्मणावी तर लग्नाअगोधर गोंवर निघाला होता. त्याचे वेथेनें वारली. रोजमजकुरींच रात्री चिंचवडीहून पांडुरंगाचे लग्न घरास आलें. रात्रीं जगोबाचेथें कल्याणीमुळें राहिले. पहाटेस आपल्या घरास नवरानवरी गेलीं.