Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

रोजमजकुरी देशमुख व बहिरोबा वाघोलीस सटवोजी जाधव याची आई मोहीबाई इचा तेरावा दिवस ह्मणून वस्त्र बांधावयास गेलीं. दुसरे रोजी आली असेत. १

शुद्ध ११ बुधवारी पेशवे श्री विठाईस दर्शनास गेले होते. १

शुद्ध १३ शुक्रवारी यमाजी माळी ढोल्या वरचेवर साजापेजा मळियांत काम करितां वारला असे. १

शुद्ध १४ मंदवारीं श्रीमंत भाऊची बसती बोर घोडी उगेंच वारली असे. रोजमजकुरीं दो अडचा प्रहरा दिवसा वळवाचा पाऊस मोठा पडिला. नागझरीस पाणी आलें. रंगारी वाहून मेला. १

आषाढ वद्य १ सोमवासर.
श्रीमंत भाऊ वाघोलीस सट-                  लडकज माळी, बाकाजी व लख-
वोजी जाधवाकडे आईच्या दुख-             माजी फसला, शेताबद्दल भांडतात.
वटियाबद्दल जाऊन आले.                    त्याची साक्ष श्रीनागोबापाशीं घेतली.
                                                      पांढरीची.

वद्य ३ सह ४ बुधवार पेशवे व महादोबा थेवरास श्रीच्या दर्शनास जाऊन आले.