[१८४]                                                                               श्री.                                                                  २४ सप्टेंबर १७९५.                                 
विनंति विज्ञापना. अलीज्याहबाहादूर यांस सदाशिवरड्डी व नाजमन्मुलूक यांनीं फरेब देऊन मझेला उभा केला. तो रफा झाला पाहिजे यास्तव येथून शिकंदरज्याहबहादूर यास रवाना करावें, हे तजवीज योजिली. येविषयींची सलाह कशी इत्यादिक पूर्वीं नबाबाचे बोलण्यांत आल्याअन्वयें विनंति लिहिली होती. त्याचें उत्तर सरकार आज्ञेप्रमाणें राजश्री गोविंदराव भगवंत याणीं लिहिलें, तेच पुरवणी नबाबास वाचून दाखविली. याजवर नबाबाचे बोलण्यांत आलें कीं, सिकंदरजाह यास कामास पाठविलें असतां जाईल हे खातरजमा आहे. लेकिन, याचे जाण्यांत, तिकडून आलीज्याह, इकडून शिकंदरज्याह, भाईभाईची लढाई, असा प्रकार दिसतो. व भावाभावांत कटकट लावून दिल्ही, आपण तमाषबीनी करितात, असें जातीकडे येतें. पुढें जीद राहील यास्तव शिकंदरज्याहाचें निघणें मवकूफ केलें. आह्मीं निघण्यास तूर्त बराबफात रबिलावलच्या बारा तारखेपर्यंत आहेत. पुढें पहावें तसे करावें. निघण्याची आमची तारीख अद्याप निश्चयांत आली नाहीं. मगर डेरे उद्यां परवां इतके द्यावे याप्रमाणें आहे. ह्मणून बोलण्यांत आलें. र।। छ १० र।।वल. हे विज्ञापना.