[१७३]                                                                               श्री.                                                                  २२ सप्टेंबर १७९५.                                 
विनंति विज्ञापना. होनगुंद्यापैकीं गांव क्यामन्मुलूक यांनीं दाबलें तें सरकारांत सोडावें व मुदगलबाबद स्वराज्याचा ऐवज राहिल्यापासोन फडच्या करावा हें बोलणें आमचें नवाबाशीं होत आहे. सांप्रत तुमसं मत दरोबस्त सत्तावीस गांवांत सरकारची जफ्ती आली. कामदारांनीं ठाणीं घेतलीं. उपसर्गाचा बोभाट आल्यावरून कयामन्मुलूक यांचें ह्मणणें, तुमसंमत होणगुंद्याची नाहीं, मुदगलपैकीं. याची तकरार पेशजीही पडली होती. तेसमयीं श्रीमंतांचे सरकारची सनद जमीदाराचे नांवें आहे, व जमीदारापासोनही मुचलका घेतला त्याच्या नकला यांनीं दिल्ह्या. त्यासहित त।। राजश्री गोविंदराव भगवंत यांस लिहिलें आहे. विनंति करतील. त्यावरून ध्यानास येईल. उत्तराविषयीं आज्ञा झाली पाहिजे, व सरकारचा ऐवज मुदगलबाबद कोण सालापासून काय राहिला याचेही यादरवानगीस आज्ञा जाली पाहिजे. र।। छ ८ र।।वल. हे विज्ञापना.