[१६९]                                                                               श्री.                                                                  २२ सप्टेंबर १७९५.                                 
विनंति विज्ञापना. अलिजाहबहादूर सदाशिवरड्डी जमीयतसहित बेदर येथें आहेंत. दोन कोसांवर मुसारेमू, घासीमिया, व अजमखान, इसामिया नबाबाकडील सरदार फौजेसमवेत उतरले त्या स्थळीं आहेत. छ २० सफरीं लढाई झाली तितकी. त्या अलीकडे लढाई नाहीं. अलीज्याह व सदाशिवरड्डी व नाजमन्मुलूक यांजकडून तिघे गृहस्थ मुसारेमू व पागावाले वगैरेकडे जाबसालास आले होते. त्यांचें यांचें बोलणें होऊन मुसामा।र वगैरेनीं अर्ज्या नवाबास त्यांजकडील गृहस्थाचे बोलण्याअन्वयें लिहिल्या. येथून त्यांचे जबाब इनायतनामे नबाबाकडून रा।। जाले त्यांत काय प्रकारें लिहिलें हें अद्याप समजण्यांत आलें नाहीं. खचित समजल्यावर विनंति लिहीन. गालबजंग व रुकमारड्डी वगैरें अलिज्याहाकडील सरदार संगारड्डीसुद्धां बाहेर तालुक्याचे ठाणीं दखला सज्याबज्या गेले होते ते जमीयतसुद्धां अलीज्याहा यांजकडे आले ह्मणून वर्तमान आहे. आसदअल्लीखान याची अर्जी नबाबास आली होती कीं गुलाम जमीयतसुद्धां हुजूर बार्याब होतो. जबाब गेला कीं तुह्मी आपले जमीयतीनशीं मुसारेमूपाशीं षामील व्हावें. याजवर होईल वर्तमान तें लिहिण्यांत येईल. रा॥ छ ८ र।।वल, हे विज्ञापना.