Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५४] श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेशी.
चरणरज गोविंद बापूजी जनी खोत मौजे गोठणें देवाचें. साष्टांग नमस्कार विनंति. त॥ वैशाख शुध्द तृतीया पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सहकुटुंब कुशलरूप असे. विशेष. खंडोजी साळवी याबराबर आज्ञापत्र सादर जाहलें कीं, पासोडी मागोन आणून पाठवावी, ह्मणून आज्ञा. आज्ञेप्रमाणें राजापुरास र॥ त्रिंबकपंत व कुलकरणी असे त्रिवर्ग गेलों, आणि आपला कागद आह्मास होता तोही त्यास नेऊन दाखविला. परंतु त्या प्रतीची पासोडी व आणखी प्रतीच्या आपणापाशी नाहीं, व राजापुरामध्ये नाहीं. हर कोठें जालनापूर अगर पैठण येथून यत्न करून करवावी. तेव्हां मिळेल. मध्ये आपले संग्रही सोवळेची पासोडी नाहीं. आपणापाशी असोन अंतर करीन तर स्वामीचे पायाची शपत करितों. मिळाली नाहीं विदित होणें. वरकड स्वामीकारणें फणसपोळी वजन ५ पाचशेर व नारळ येक, येणें प्र॥ खंडोजीबराबर पाठविलें आहे. दया करून घेणार स्वामी खावंद आहेत.