Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

फुकट गोष्टी सांगावयास मिळतात. कार्य करणें बहुत मुश्कील आहे. तुह्मी ह्मणाल तुह्मास इतके काय पडिले आहे, तरी तुमची दोनशे रुपयाची असामी तेथें कारकून न ठेविता, रुपया खर्च न होतां तुह्मास खर्चास रुपये आल्याने आह्मांस संतोष आहे. त्यामध्यें जे आपण तजवीज केली असेल ते उत्तमच केली असेल. मुख्य गोष्ट आपले दोनशे रुपये आपल्या घरास आले ह्मणजे आह्मांस हजाराची जोड जाहली. जे तजवीज अगर कारभार करणें तो आपल्या बुध्दीने करणें. शंभराचे गोष्टीनें शेवट लागत नाहीं. आपल्यास सीतज्वरं बहुत दिवस येतो. फारसें बेजार केले ह्मणून आइकिलें त्याजवरून फारशी चिंता लागली आहे. देवडीचे वर्तमान ऐसे व्हावयास आपला वशिला गेला आणि लिहिण्यानें बहुत हैरान केले. राजश्रीपाशीं तरी अहोरात्र सेवा घडावी तेहीं अंतर पडिलें. याजमुळें व आपल्याही शरीरांत शक्त तीळभर नाहीं. ऐशा तीन गोष्टीची फिकीर आह्मांस फारशी लागली आहे तें पत्री काय ल्याहावें. हल्लीं कांही वैदी व अनुष्ठान दोन गोष्टीचा उपाय करणें. ईश्वर कृपा करील. कांही फिकीर न करणें. तुह्मी थोडक्यांत दोन तीन दु:खें पाहिलीत. पुढें आश्रय कोणाचा दिसत नाहीं, या गोष्टीची काळजी चिंता धरलीत असाल, तर हा मृत्युलोक आहे. तुह्मांस काही फिकीर नव्हती. परंतु ईश्वरगतीस उपाय काय आहे ? सर्व काळजी सोडून देणें. आणि वडिलांचे पुण्य समर्थ आहे, व श्रीचेंही पुण्य बलवंत आहे. ईश्वरावर भार सर्व गोष्टींचा घालणें. ईश्वर परिणामास नेईल. कांही फिकीर नाहीं. आपण काळजी मात्र करावी. कर्ता समर्थ तोच आहे. तो ठेवील जैसें, चालवील तैसें चालूं. पुढें कैसें चालेल हेही फिकीर तुह्मांस लागलीच आहे, तेही दूर करणें. सर्व गोष्टी ईश्वर चालवील. तीळभर काळजी न करणें. शरीरास आरोग्य करून राजश्रीची सेवा करून तेथेंच राहून कृपा संपादून घेणें. आपणापाशीं दुसराही कोणी कर्ता माणूस नाहीं. जे अहोरात्र छत्रपतीपाशीं तुमचे तर्फेने राहोन दया संपादून राहे ऐसा नाहीं. कोणी शाहाणा माणूस आणि मेहनती ऐसा मिळेल... आपल्या बुध्दीनें जे होईल ते केलियास उत्तम गोष्ट होत्ये ऐशी प्रचीत आह्मास आहे, ह्मणून सूचनार्थ लिहिले आहे. बहुत ल्याहावें तरी सूज्ञ आहां. आह्मी माळव्यांत धार मांडवगड येथें छावणीस श्रीमंतांनी ठेविले तेथें राहिलों. पुढें दरबारी कोणी नाहीं. आणि छावणीमुळें सरदारीस कर्ज वीस हजार रुपये जाहलें. व दरमहा रुपये किल्ल्याचे बेगमीस पंचवीस हजार रुपये पाहिजेत. व चार मामलती पदरीं आहेत. त्याचे हिसेबाच्या वगैरे गोष्टीविशी अडथळा आह्माकरितां जाहला, तेव्हां तेथून यावें लागलें. श्रीमंतास पत्र लिहिलें होतें त्यांणी आज्ञा केली जे :- तुह्मी येणें करा. तैसेंच उठोन आलों. पुणियास आलियावर आह्मास सीतज्वर लागला तो अद्याप येतच आहे, आठ रोजाचा निरोप घेऊन घरास आलो आहों. शरीरास आरोग्य नाहीं. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे हे विनंति.